जेव्हा पार्टीमध्ये स्वत:ला स्टाईल करण्याची वेळ येते. तेव्हा आपण एथनिक पासून ते वेस्टर्न आणि इंडो-वेस्टर्न पर्यंत आऊटफिट स्टाईल करण्याला आपण प्राधान्य देतो. आपण आऊटफिट कोणताही कॅरी करत असलो तरी आपल्याला त्यामध्ये नेहमीच एक डिफरंट लूक हवा असतो. तर अशावेळी आपल्या आऊटफिटमध्ये एक वेगळा एक्स फॅक्टर आपण नेहमीच बघितला पाहिजे. जर तुम्ही पार्टीमध्ये साडी नेसू इच्छित असाल तर रफल साडी स्टाईल करणं एक चांगली आयडिया ठरू शकते.
रफल साडी तुम्ही लग्नापासून ते कॉकटेल पार्टी किंवा एखाद्या खास प्रसंगी देखील तु्म्ही नेसू शकता. रफल साडी एथनिक वेअरमध्येही तुमचा लूक ट्रेंडी बनवू शकते. रफल साडी दिसायला खूप सुंदर दिसते परंतु हिला स्टाईल करणं खूपच कठीण असू शकतं. रफल साडीमध्ये तुमचा लूक नेहमी बॅलेन्स करण्यासाठी साडीसोबत ब्लाऊज आणि एक्सेसरीज अशा लहानसहान डिटेलिंगकडेही लक्ष द्यायला हवे. आज जाणून घेऊयात अशा काही टिप्सबद्दल ज्या तुमच्या रफल साडीच्या लूकला स्टायलिश बनवू शकतील.
योग्यरितीने निवडा ब्लाऊज :
रफल साडीमध्ये तुमचा लूक अनेकदा ब्लाऊजच्या स्टाईलवर अवलंबून असतो. यासाठी ब्लाऊजची निवड योग्यरितीने केली पाहिजे. जर तुम्ही रफल साडीमध्ये मॉडर्न लूक कॅरी करू इच्छित असाल तर तुम्ही सीक्वेन्स किंवा एम्ब्रॉयडरी असलेले क्ऱॉप टॉपही घालू शकता. तसेच एखाद्या ग्लॅमरस पार्टीवेअर लूकसाठी तुम्ही ऑफशोल्डर किंवा हॉल्टर नेक असणारा ब्लाऊजही ट्राय करू शकता. जर तुम्हाला तुमचा लूक अधिकच ड्रामेटिक बनवायचा असेल तर तुम्ही पेपलम ब्लाऊजही ट्राय करू शकता.
रफल्स डिटेल्सवर करा फोकस :
या साडीमध्ये रफल डिटेल्स खूप आवश्यक असतात. यामुळे तुमचा ओव्हरऑल लूकही बदलू शकतो. पार्टीच्या लूककडे लक्ष दिल्यास वाइन, एमरल्ड ग्रीन किंवा मॅटेलिक शेडस् असणारी रफल साडी तुम्ही निवडू शकता. याशिवाय तुम्ही फ्लोरल डॉटस् पासून ते पोल्का डॉटस् पर्यंत किंवा ओम्ब्रे इफेक्टस असलेली साडीदेखील तुम्ही ट्राय करू शकता.
ड्रेपिंग वेगळी असायला हवी :
रफल साडी सिंपल पद्धतीने ड्रेप केल्यावरही ती खूप खास दिसते. परंतु तुम्हाला वेगळा लूक हवा असेल तर तुम्ही याला पँट स्टाईल किंवा लेहंगा स्टाईलमध्येही ड्रेप करू शकता. या लूकमध्ये रफल्स जास्त हायलाइट होतात. जर रफल साडीमध्ये तुम्हाला एक स्टेटमेंट लूक हवा असेल तर बेल्टसोबत देखील तुम्ही हा पेअर करू शकता.
दागिने आणि हेअरस्टाईलमध्ये गडबड करू नका :
रफल साडी स्टाईल करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा केवळ साडी आणि ब्लाऊज स्टायलिंग इतकंच पुरेसं नसतं तर दागिने आणि हेअरस्टाईल वरही तितकंच लक्ष देणं गरजेचं आहे. दागिन्यांमध्ये तुम्ही मोठ्या साईजमध्ये मिळणारे चांदबाली किंवा हूप इयररिंग्स ट्राय करू शकता. हे तुम्हाला परफेक्ट पार्टी रेडी लूक देऊ शकतील.
जर तुम्ही नेकपीस घालू इच्छित असाल तर तुम्ही चोकर किंवा लेयर्ड नेकलेस ट्राय करू शकता. एक्सेसरीजमध्ये पार्टी वाइब्स मिळवण्यासाठी ग्लिटरी किंवा मॅटेलिक क्लच देखील तुम्हाला ट्राय करता येईल. हेअरस्टाईलमध्ये मेसी बनपासून ते कर्ल्सपर्यंत, वेव्स किंवा पोनीटेलही ट्राय करता येईल.
हेही वाचा :
Edited By – Tanvi Gundaye