दिवसातून 8/10 ग्लास पाणी पिणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानले जाते. अनेक तज्ज्ञ पाणी पिण्याचा सल्ला देतात. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे आपली त्वचा फ्रेश राहते, पचनशक्ती चांगली राहते, किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो आणि असे असंख्य फायदे आपल्याला पाण्यामुळे मिळतात; मात्र कित्येकांना पाणी पिण्याची योग्य पद्धतच माहिती नसते.
सकाळी कोमट पाणी प्यावे
सकाळी उठल्यानंतर तुम्ही उपाशीपोटी कोमट पाणी पिण्याने फायदा मिळतो. तुमचे पोट यामुळे स्वच्छ राहादते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास यामुळे मदत मिळते. याशिवाय दिवसभर अन्नपचन व्यवस्थित होते.
जेवणानंतर दीड तासानंतर
जेवणानंतर दीड तासानंतर पाणी प्यायल्यास ते तुम्हाला बल म्हणजे ताकद देऊन जाईल. अन्नपचन करण्यासाठी तुम्हाला पाण्याची गरज असते. अशावेळी जेवणानंतर दीड ते दोन तासांनी पाणी प्यायल्यास ते तुम्हाला फायदेशीर ठरेल.
जेवायला बसल्यावर पाणी पिणे
जेवताना किंवा जेवायला बसल्यावर आहारासोबत पाणी पिणे हे अमृतासारखे आहे. कारण अन्न, आहार पुढे ढकलायला पाण्याची गरज असते. अशावेळी जेवताना थोडे पाणी प्यायल्यावर ते अमृतासारखे असेल.
पाणी कसे प्यावे?
आयुर्वेदानुसार उभे राहून कधीही पाणी पिऊ नये. उभे राहून पाणी पिणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. तज्ज्ञांच्या मते, पाणी नेहमी बसून प्यावे. बसून पाणी प्यायल्याने ते शरीरात चांगले शोषले जाते.
एकदाच घटाघटा पाणी पिऊ नये
एकाच वेळी अथवा एका श्वासात भरपूर पाणी पिणे योग्य ठरत नाही. पाणी हे नेहमी आरामात प्यावे आणि एक – एक घोट घेत ते संपवावे. पोटाचे आरोग्य आणि पचनक्रिया उत्तम राहण्यासाठी याचा फायदा होतो. पचन योग्य असेल तर त्वचाही चमकदार राहाते.
जेवणाच्या शेवटी…
जेवणानंतर पाणी प्यायल्यास ते शरीरात अगदी विषासमान काम करते. त्यामुळे जेवणानंतर कधीच पाणी पिऊ नये. एकतर ते जेवताना प्यावे किंवा जेवल्यानंतर दीड ते दोन तासांनी प्यायवे. आहारासोबतच आयुर्वेदात पाण्याचे खूप महत्त्व आहे.
Edited By : Nikita Shinde