झटपट बनवा साबुदाणा पापड आणि कैरीचे लोणचं

उन्हाळा सुरू झाला की घरोघरी महिलांची , लोणंची,पापड, कुऱडई, उपवासाच्या चकल्या, लोणची बनवण्याची सरबराई सुरू होते. पण नोकरदार महिलांना वेळच नसल्याने बाजारात मिळणाऱे तयार पापड, लोणची घेण्याकडे महिलांचा कल वाढत आहे. पण आज आम्ही तुम्हांला कमी वेळात झटपट बनणाऱ्या साबुदाणा बटाटा पापड आणि लोणंच्याची (Sabudana Batata Papad Recipe) रेसिपी सांगणार आहोत.

साबुदाणा पापड

साहित्य- १ वाटी – साबुदाणा, 2 – बटाटे, 2 चमचे जिरे, चवीनुसार मीठ

कृती- सर्वप्रथम कोरडा साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करावा. ही पावडर कोमट पाण्यात ५ ते ६ तास भिजत ठेवावी. नंतर ती चमच्याने एकजीव करावी. त्यातील पावडरच्या गुठळ्या बाजूला काढून घ्याव्यात. दुसरीकडे बटाटा उकडून कुसकरून घ्यावा. नंतर कुसकरलेला बटाट्यात साबुदाणा पेस्ट टाकावी. तसेच त्यात जिरपूड आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून त्याचे गोलाकार चपटे गोळे बनवा. कडक उन्हात प्लास्टीकवर किंवा ताटात १-२ दिवस वाळण्यास ठेवा. पापड कडक वाळल्यावर हवाबंद डब्यात ठेवा.

कैरी लोणचं

साहित्य- दोन मध्यम आकाराच्या कैऱ्या, दोन चमचे लोणचे मसाला, तीन चमचे वाटी गुळ पावडर, दोन चमचे तेल, चार चमचे तिखट, चवीनुसार मीठ

 

कृती- सर्वप्रथम कैरीच्या बारीक फोडी करून घ्याव्यात. त्यात लोणचे मसाला टाकावा. तीन चमचे गुळ पावडर टाकावी. त्यात मीठ टाकावे. नंतर त्यात गरम तेल टाकून मिश्रण एकजीव करावे. दोन तीन तासात हे लोणचं तेलात छान मुरतं. हवाबंद डब्यात किंवा बरणीत हे लोणचे ठेवावे.