घरलाईफस्टाईलऐकटेपणावेळी Sad Songs देतात साथ, अभ्यासातून दावा

ऐकटेपणावेळी Sad Songs देतात साथ, अभ्यासातून दावा

Subscribe

जेव्हा आपल्या आजूबाजूला एखादे सॅड सॉन्ग किंवा म्युझिक जरी लावले असेल तरी लगेच विचार येतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी झाले आहे. आता पर्यंत यावरुन हेच मानले जात होते. परंतु याचा खरंच फायदा होतो असे एका अभ्यासातून दावा करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या एका दाव्यात असे म्हटले गेले आहे की, आपल्याला कधीच उदास रहायचे नसते. परंतु म्युझिकच्या माध्यमातून ती भावना अनुभवण्याची इच्छा होते.

रिसर्चर आणि येल युनिव्हर्सिटीचे साइकोलॉजिस्ट डॉक्टर जोशुआ नोबा यांनी असे म्हटले की, व्यक्तीच्या डोक्यात एका काळापर्यंत एखाद्या गोष्टीची कॉन्सेप्ट तयार होते. एक म्हणजे रिअल आणि दुसरी म्हणजे वर्चुअल. सॅड म्युझिकसोबत हे सुद्धा होते. ही गाणी जुन्या आठवणीत आपल्याला घेऊन जातात. परंतु प्रत्येक वेळी उदास रहाणे गरजेचे नाही.

- Advertisement -

दु:खापासून दूर ठेवतात
सॅड म्युझिक आवडण्यामागील काही वैज्ञानिक पैलू आहेत. दु:ख, उदासीनता किंवा तणावाच्या स्थिती सॅड म्युझिक प्रोलेक्टिन हार्मोन्स रिलिजला अॅक्टिव करतात. दु:ख दूर होण्यासाठी सॅड सॉन्ग ऐकल्यानंतर थोडं हलकं वाटते.

हॅप्पी म्युझिक आनंदी करतीलच असे नव्हे
डॉक्टर नॉब आणि फॉर्मर विद्यार्थी, कॉग्नेटिव वैज्ञानिक तारा वेंकटेशन द्वारे करण्यात आलेला हा रिसर्च जनरल ऑफ एस्थेटिक एज्युकेशन मध्ये पब्लिश झाला आहे. यामध्ये त्यांनी असे सांगितले की, हॅप्पी म्युझिक नेहमीच आनंदीत करतील आणि सॅड म्युझिक दु:खी करतील असे नाही. खरंतर सॅड म्युझिक नकारात्मक भावनांपासून बाहेर पडण्यास मदत करतात. यामुळे उदास असलेल्या व्यक्तीचा तणाव कमी होतो आणि एकटेपणावेळी त्याला आपल्यासोबत कोणीतरी आहे असे वाटत राहते.

- Advertisement -

हेही वाचा- मेरे सय्याजी से Breakup कर लिया…; दुःखातून सावरण्यासाठी ‘या’ आहेत टीप्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -