सध्या बहुतेक लोक एटीएम कार्डसह क्रेडिट कार्ड वापरतात. पण कधी कधी अशी परिस्थिती उद्भवते की आपल्या बँक अकाऊंटमध्ये पैसे नसतात. अशा या परिस्थितीत, लोक सहसा त्यांच्या मित्रांकडून किंवा कुटुंबाकडून पैसे उधार घेऊन त्यांचा व्यवसाय चालवतात. पण क्रेडिट कार्ड देखील अशावेळी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. साधारणपणे, आपण सर्वजण याचा अधिक वापर ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदीसाठी आणि पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी करतो. परंतु अनेकांना हे माहित नसतं की क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही थेट तुमच्या बँक खात्यात पैसेही पाठवू शकता. आज या लेखात जाणून घेऊयात अशा काही सोप्या टिप्स ज्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डद्वारे बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता.
रोख रकमेची गरज असताना क्रेडिट कार्ड कसे वापरावे?
अनेक वेळा आपल्याला रोख रकमेची गरज असते. अशा परिस्थितीत जर तुमच्याजवळ क्रेडिट कार्ड असेल तर काळजी करण्याची गरज नाही, तुम्ही एटीएममध्ये जाऊन क्रेडिट कार्डद्वारे पैसे काढू शकता.
- सर्वप्रथम तुमच्या जवळच्या एटीएम केंद्रात जा.
- यानंतर, क्रेडिट कार्डमधून आवश्यक असलेली रोख रक्कम काढा .
- आता तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते तुमच्या बँक खात्यात जमा करू शकता.
- रोख रक्कम काढताना, लक्षात ठेवा की ही प्रक्रिया करत असताना उच्च व्याज दर आणि अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते.
क्रेडिट कार्डवरून बँकेत पैसे कसे हस्तांतरित करावे?
तुम्हाला तुमच्या बँक खात्यात पैसे हवे असल्यास , तुम्ही ऑनलाइन बँकिंगद्वारे थेट तुमच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. सोपी प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊयात.
- सर्वप्रथम, तुमच्या बँकेच्या नेट बँकिंग पोर्टलवर लॉग इन करण्याची प्रक्रिया करा.
- यानंतर फंड ट्रान्सफर किंवा बिल पेमेंट पर्यायावर क्लिक करा.
- आता तुमच्या बँक खात्याचे तपशील येथे टाका आणि रक्कम भरा.
- नंतर पेमेंट ट्रान्सफर कन्फर्म करा.
- परंतु लक्षात ठेवा की बँकेच्या नियमांनुसार ही सुविधा बदलू शकते.
या गोष्टी लक्षात ठेवा :
आपण सर्वजण एकप्रकारे क्रेडिट कार्ड्समधून पैसे उधार घेतो, जे वेळेच्या आधी योग्य व्याजदरासहित परत करावे लागतात. अशावेळी खूपच गरज असेल तरच क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट ट्रान्सफर करू शकता. जर फार गरज नसेल तर याचा वापर करणे टाळा. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर चांगला राहिल. आणि भविष्यात कर्ज घेताना व्याज दरावर लाभही मिळू शकतो.
हेही वाचा : QR Code : QR कोड खरा की बनावट कसा ओळखाल?
Edited By – Tanvi Gundaye