घरलाईफस्टाईलस्वयंपाकाच्या वेळी गृहिणींनी घ्यावी वैयक्तिक खबरदारी

स्वयंपाकाच्या वेळी गृहिणींनी घ्यावी वैयक्तिक खबरदारी

Subscribe

गृहिणींनी घ्यावी वैयक्तिक खबरदारी

बऱ्याचदा घरातील सदस्यांची काळजी घेताना गृहिणी स्वत:कडे लक्ष देत नाहीत. अशावेळी त्यांनी वैयक्तिक खबरदारी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. चला तर जाणून घेऊया महिलांनी स्वयंपाकाच्या वेळी कोणती वैयक्तिक खबरदारी घ्यावी.

  • महिलांनी स्वयंपाकघरात गॅस शेगडीचा वापर करताना सुती कपडे वापरावेत. कारण नॉयलॉनची साडी अथवा ड्रेसओढणी लवकर पेट घेते आणि पेट घेतल्यावर त्वचेला चिकटते. त्यामुळे गॅस शेगडीचा वापर करताना नॉयलॉन किंवा तत्सम कपडे परिधान करणे टाळावे.
  • गॅसच्या शेगडीवरून गरम पाण्याचे, दुधाचे पातेले किंवा स्वयंपाकाची अन्य गरम भांडी उचलताना धातूची पक्कड वापरावी. तसेच घरातील जेष्ठ महिलांना सुती कापडाच्या सहाय्याने गॅस शेगडीवरून गरम भांडी उतरवताना सुती कापडाचा वापर करावा.
  • गॅस शेगडीचा वापर करताना महिलांनी हातात प्लॅस्टिकच्या बांगड्या घालणे टाळावे. कारण गॅस शेगडीचा वापर करताना हात असणाऱ्या बांगड्या गरम होऊन त्वरित पेट घेण्याचा संभव असतो. त्यामुळे हाताला गंभीर इजा होण्याची शक्यता असते.
  • बहुतांश घरात देवघर स्वयंपाकघरात असतो. त्यामुळे घरातून बाहेर जाताना समई-निरांजन इत्यादी पेटते ठेवून जाऊ नये, कारण उंदीर पेटती वात घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आग लागण्याची घटना घडू शकते.
  • स्वयंपाकघरात गॅस शेगडीचा वापर करताना महिलांनी आपले केस मोकळे न ठेवता बांधून ठेवण्याची सवय लावणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -