Friday, April 19, 2024
घरमानिनीRelationshipपार्टनरबरोबर safe sex बदद्ल बोलायलाचं हवं

पार्टनरबरोबर safe sex बदद्ल बोलायलाचं हवं

Subscribe

आपण सर्वजण सेफ सेक्सबद्दलच्या काही गोष्टी ऐकतो. सेफ सेक्ससाठी कंडोम वापरण्याचा सल्ला ही दिला जातो. परंतु तरीही बहुतांश लोक सेक्स करताना त्याचा वापर करत नाहीत. अशातच सेक्शुअल इंन्फेक्शन, एसटीडी, अनवॉन्टेड प्रेग्नेंसी अशा समस्या उद्भवू शकतात. आजच्या बदलत्या काळात ही कंडोमचे नाव काढले की एक विचित्र रिअॅक्शन देतात. कंडोम खरेदी करताना सुद्धा लोक घाबरतात. कंडोम न वापरण्यामागील सर्वाधिक मोठं कारण असं सांगितले जाते की, सेक्स करतेवेळी कंडोम वापरल्यास प्लेजर मिळत नाही. (Safe sex talk with partner)

खरंतर कंडोम वापरल्यानंतर प्लेजर मिळत नाही असे बोलणे खरंतर चुकीचे आणि असुरक्षित आहे. कंडोमचा वापर केवळ अनवॉन्टेड प्रेग्नेंसी नव्हे तर एसटीआय, एसटीडी सारख्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी वापरण्याचा सल्ला दिला जातो. पण बहुतांश लोक एकमेकांचे ऐकून कंडोम वापरण्याबद्दलचा गैरसमज मनात निर्माण करतात. एखाद्याला कंडोम सूट होत नसेल तर याचा अर्थ असा नाही की तु्म्ही सुद्धा कंडोम वापरु नये. कंडोम विविध आकारामध्ये येतात. जर एखाद्याला लॅटेक्सपासून एलर्जी असेल तर नॉन-लॅटेक्स कंडोमचा वापर करु शकता.

- Advertisement -
Safe sex talk with partner
Safe sex talk with partner

या व्यतिरिक्त लुब्रिकेशन बद्दल लोकांमध्ये कंडोम सारखीच स्थिती आहे. बहुतांश लोकांना असे वाटते की, लुब्रिकेशन सेक्स टॉय प्रमाणेच एक्स्ट्रा प्रॉप्स मध्ये येतात. परंतु वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिले तर असे नाही. लुब्रिकेंट्स सेक्स प्लेजरचा अनुभव आनंददायी बनवण्यासाठी फार कामी येतात. सर्वसामान्यपणे महिलांचा वजाइना ड्राय असल्याने सेक्स दरम्यान त्यांना दुखते. अशातच त्यावेळी लुबचा वापर केला पाहिजे. (Safe sex talk with partner)

आपल्या सेक्स म्हणजे केवळ प्रजननासाठी असते असे बहुतांशवेळा सांगितले जाते. पण सेक्स दरम्यान मिळणाऱ्या प्लेजर बद्दल कधीच बोलले जात नाही. खरंतर नातं उत्तम आणि सुरळीत चालवण्यासाठी प्रेम,विश्वास या भावना असाव्यात. पण पार्टनर्सनी सेफ सेक्स बद्दल ही बोलले पाहिजे.

- Advertisement -

हेही वाचा- Oral Sex ओरल सेक्समुळे कॅन्सर होतो का?

- Advertisment -

Manini