देशभरात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून दिल्ली नंतर आता मुंबई, पुण्यासारखी शहरेही महिलांसाठी असुरक्षित झाली आहेत. तर दुसरीकडे मुलांच्याबरोबरीने मुलीही नोकरी आणि शिक्षणासाठी दुसऱ्या शहरांमध्ये , देशांमध्ये राहत आहेत. पण सध्याची परिस्थिती पाहता देशाबरोबरच परदेशातही महिलांसाठी वातावरण असुरक्षित आहे. यामुळे सर्वच वयोगटातील महिलांनी सुरक्षिततेसाठी इतरांवर अवलंबून न राहता स्वत : अलर्ट राहणेही गरजेचे झाले आहे. याचदरम्यान, जर कामानिमित्त तुम्हाला एकट्याला रात्री घराबाहेर पडावे लागले किंवा ऑफिसमधून घरी येण्यास रात्री उशीर झाला तर न घाबरता सावध राहूनही तुम्ही परिस्थिती कशी हाताळू शकता ते बघूया. त्यासाठी मानिनीच्या काही सेफ्टी टिप्स तुमच्या नक्की कामा येतील.
मोबाईल
रस्त्यावरून एकट्याने चालताना तुम्ही मोबाईल पर्समध्ये न ठेवता हातात ठेवू शकता. चालताना जर तुम्ही मोबाईलवर बोलत असाल तर निर्जन रस्त्यावरून चालताना तुम्हाला धीर मिळतो, पण त्यादरम्यान तुमची नजर रस्त्यावर आणि तुमच्या आजूबाजूच्या रहदारीकडे देखील असायला हवी. मोबाईल हातात असल्याने आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी तुम्ही लगेचच घरच्यांशी संपर्क साधू शकता.`
रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे
फूटपाथवरून चालताना डाव्या हाताने जावे असे म्हणतात. पण जेव्हा रस्त्यावर वर्दळ कमी असेल तेव्हा तुम्ही उजव्या फूटपाथवरून चालावे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जी काही वाहने येणार आहेत ती तुमच्या समोरून येणार आहेत. तुमच्यावर मागून कोणीही हल्ला करू शकणार नाही. फूटपाथवर कोणी तुमचा पाठलाग करत असला तरी समोरून येणाऱ्या वाहनांमुळे तुमच्यावर हल्ला करण्याचे धाडस त्याला होणार नाही.
गडद रंगाचे कपडे
रात्री रस्त्यावरून चालताना हलके आणि भडक रंगाचे कपडे परिधान करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरते. जेव्हा तुम्ही दिवसा उजळ रंगाचे कपडे घालता आणि रात्री हलक्या रंगाचे कपडे घालता, तेव्हा रस्त्याने जाणारे आणि फूटपाथवरून चालणारे इतर पादचारी तुम्हाला सहज पाहू शकतात. तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्यास, लोक तुमची मदत करण्यासाठी त्वरीत तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात.
आरामदायक फूटवेअर
जर तुम्हाला रस्त्यावर एकटेच चालावे लागत असेल तर तुमचे शूज असे असावेत की तुम्ही सहज जलद चालू शकता किंवा गरज पडल्यास पळून जाऊ शकता. त्यामुळे अशा परिस्थितीत हाय हिल्स न घालणेच योग्य ठरेल. फ्लॅट किंवा शूज एक चांगला पर्याय आहे.
चाव्या
रस्त्यावरून एकट्याने प्रवास करताना चाव्या खूप उपयोगी पडू शकतात. तुम्ही चाव्या तुमच्या खिशात किंवा बॅगमध्ये अशा ठिकाणी ठेवा जेथे तुम्ही त्यांना ताबडतोब बाहेर काढू शकता आणि हातात घेऊ शकता. आणीबाणीच्या परिस्थितीत तुम्ही त्यांचा शस्त्रे म्हणून वापर करू शकता.
पेपर स्प्रे
महिलांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅगमध्ये नेहमी पेपर स्प्रे ठेवावा. त्यामुळे जर कोणी अनोळखी व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल तर त्याच्या चेहऱा आणि डोळ्यावर पेपर स्प्रे मारून तुम्ही तिथून पळून जाऊ शकता.