Monday, May 29, 2023
घर मानिनी Health सॅनेटरी नॅपकीनच्या वेंडिंग मशीनचा 'असा' करा वापर

सॅनेटरी नॅपकीनच्या वेंडिंग मशीनचा ‘असा’ करा वापर

Subscribe

सॅनेटरी नॅपकीनची वेंडिंग मशीन प्रत्येक महिला प्रसाधनगृहात, कॉलेज, रुग्णालय, रेल्वे स्थानकातील शौचालयांमध्ये दिसते. बहुतांश वेळा असेहोते की, गरज असते पण त्या वेंडिंग मशीनचा पॅडसाठी कसा वापर करायचा हे माहिती नसते. याच बद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.

सर्वात प्रथम गाइडलाइन्स वाचा
प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सॅनिटरी नॅपकिनची वेंडिंग मशीन लावलेली दिसेल. सर्वसामान्यपणे सर्व मशीन्स या एकसमानच असतात. पण त्याचा वापर करणे थोडंस वेगळं असते. मशीनचा वापर करण्यापू्र्वी तुम्ही त्यावर लिहिलेल्या गाइडलाइन्स व्यवस्थितीत वाचल्या पाहिजेत.

- Advertisement -

पेमेंट कसे कराल?
सॅनिटरी नॅपकीनच्या वेंडिंग मशीनमध्ये पेमेंट करण्यासाठी एक वेगळा ऑप्शन आणि जागा दिली जाते. बहुतांश मशीन्स केवळ नाणंच स्विकारतात तर काही मशीन्स ऑनलाईन पेमेंटचा सु्द्धा ऑप्शन देतात. एक पॅड किती रुपयांचा आहे याची माहिती मशीनवर दिली जाते. जेव्हा तुम्ही पेमेंट करता तेव्हा सॅनेटरी पॅड मशीनमधून बाहेर येते.

- Advertisement -

कधी कामी येते वेंडिंग मशीन
बहुतांशवेळा असे होते जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो तेव्हा कधीकधी सॅनिटरी पॅड विसरतो. तेव्हा वेंडिंग मशून फार कामी येते. हेच कारण आहे की, आजकाल शाळा, कॉलेज, मॉल, सुपरमार्केट, सिनेमा थिएटर, ऑफिस, हॉस्टेल अशा बहुतांश ठिकाणी सॅनिटरी नॅपनिकची वेंडिंग मशीन लावलेली दिसते.


हेही वाचा- Period Tracker: व्हॉट्सअॅपवर अशी ट्रॅक करता येईल पीरियड्सची तारीख

- Advertisment -

Manini