Monday, January 13, 2025
HomeमानिनीFashionSaree Draping Tips : साडी नेसताना करू नयेत या चुका

Saree Draping Tips : साडी नेसताना करू नयेत या चुका

Subscribe

साडी हा सर्वात सुंदर आऊटफिट आहे. परंतु याचं सौंदर्य तेव्हाच उठून दिसतं जेव्हा साडी योग्यरित्या नेसली जाते. जर तु्म्हालाही साडी नेसणे खूप आवडत असेल तर साडी नेसताना कधीही या चुका करू नये.

1. चुकीच्या मापाचा ब्लाऊज :

साडीचे सौंदर्य तेव्हाच सुधारतं जेव्हा ब्लाऊज योग्य माप असलेला असतो. जर तुम्ही फारच बारीक किंवा फार जाड असाल तर इतरांचं पाहून ब्लाऊज अगदीच टाईट किंवा सेक्सी ब्लाऊज शिवू नका. हेवी बॉडी असलेल्या महिलांव फार एक्स्पोझिव्ह ब्लाऊज चांगले दिसत नाहीत. खूप ढगळ असणारे ब्लाऊजही तुमचा लूक बिघडवू शकतात. यासाठीच चांगल्या टेलरकडून ब्लाऊज शिवून घ्या.

- Advertisement -

2. फ्लेयर्ड पेटिकोट :

फ्लेयर्ड म्हणजेच घेरवाले पेटिकोट वापरणे टाळा. यामध्ये तुम्ही जाड दिसू शकता. सोबतच साडी कॅरी करतानाही तुम्हाला त्रास होऊ शकतो. बेस्ट लूकसाठी फि़टिंग असलेले प्लेन पेटिकोट घालू शकता.

3. स्टाईलसोबत करा एक्स्परिमेंट :

साडी ड्रेपिंग अनेक प्रकारची असते. जर तुम्ही कोणतीही नवीन स्टाईल ट्राय करू इच्छित असाल तर ड्रेपिंगची तीच स्टाईल ट्राय करा ज्यात तुम्हाला साडी सहजरित्या कॅरी करता येईल. जर तुम्हाला वेगळ्या प्रकारची ड्रेपिंग स्टाईल करणं येत नसेल तर तु्म्ही आयत्या वेळी प्रयोग करू नका किंवा इतर कुणाची तरी मदत घ्या.

- Advertisement -

Saree Draping Tips: These mistakes should not be done while draping a saree

4. योग्य साडीची करा निवड :

प्रत्येक वेळी एकाच प्रकारची साडी नेसली जाऊ शकत नाही. जसे की तुम्ही ऑफिसमध्ये हेवी वर्क वाली साडी नेसू शकत नाही. ऑफिसमध्ये फॉर्मल लूककरता कॉटनची किंवा हलक्या रंगाची आणि हलक्या कापडाची साडी हा बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. याचप्रकारे घरातील एखाद्या खास प्रसंगासाठी किंवा लग्नासाठी भडक रंगाची साडी नेसणं जास्त पसंद केलं जातं.

5. चुकीचे फुटवेअर :

साडीसोबत चुकूनही कॅज्युअल प्लॅटफॉर्म हील्स किंवा वेजेस घालण्याची चूक करू नका. फ्लॅट आणि स्लिपर्स घालण्यापासून स्वत:ला रोखा. गॉर्जियस लूक हवा असल्यास हाय हिल्स सँडल किंवा स्टिलेटोज (पातळ हिल्स असणारे सँडल्स) घाला. यामुळे तुम्ही बारीक आणि उंच दिसाल.

6. हेवी ज्वेलरी :

लग्न किंवा खास प्रसंग सोडल्यास इतर प्रसंगी साडीसोबत हेवी ज्वेलरी परिधान करू नका. स्मार्ट लूकसाठी मोठ्या झुमक्यांऐवजी लहान इयररिंग्स, डझनभर बांगड्यांऐवजी एक नाजूक ब्रेसलेट आणि हेवी नेकलेसऐवजी लहान पेडंटवाली चैनही तुम्ही घालू शकता. यामुळे तुम्ही केवळ अॅट्रेक्टिव्ह नव्हे तर तरूणदेखील दिसाल.

7. भरपूर पिना :

साडीचा शेप बिघडू नये आणि ती कॅरी करताना अडचणी येऊ नयेत यासाठी भरपूर पिना साडीला लावल्या जातात. यात चुकीचं असं काही नाही. परंतु पिना लावत असताना या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं की त्या पिना व्यवस्थितरित्या लपतील. नाहीतर या पिना साडीच्या बाहेर दिसू लागल्या तर ते विचित्र दिसण्याची शक्यता अधिक असते. हलक्या साडीला जास्त पिना लावू नये कारण ती फाटू शकते.

हेही वाचा : Winter Jackets : स्टायलिश लूक देणारे नवे हिवाळी जॅकेट्स


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -

Manini