जर तुम्ही मुलांसाठी शाळेची बॅग खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींकडे लक्ष देणे फार गरजेचे असते. बॅग व्यवस्थितीत नसल्यास मुलासह पालकांना सुद्धा समस्या येऊ शकतात. अशातच मुलांसाठी बॅग खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याच बद्दलच्या काही टीप्स आपण पाहणार आहोत.(School buying bags tips)
बॅगेचे वजन
काही स्कूल बॅगचे वजन अधिक असते. रिकाम्याच बॅगचे वजन अधिक असेल तर विचार करा पुस्तक ठेवल्यानंतर त्याचे वजन किती होईल. यासाठी प्रयत्न करा की, शाळेची बॅग वजनानेच हलकी असू द्या. अधिक वजन असेल तर मुलांचे खांदे दुखू शकतात.
स्कूल ट्रॉली बॅग
आजकाल मार्केटमध्ये विविध प्रकारच्या बॅग्स या मार्केटमध्ये उपलब्ध असतात. अशातच मुलाला शाळेची बॅग खरेदी करताना तुम्ही ट्रॉली बॅगचा पर्याय निवडू शकता. मात्र तेव्हा सुद्धा त्याच्या वजनाकडे लक्ष द्या.
बाजूला पॉकेट्स असणारी बॅग
काही बॅग्सला बाजूला पॉकेट्स नसतात. अशातच बॅग खरेदी करताना त्याच्या बाजूला पॉकेट्स आहेत की नाही हे पहा. साइड पॉकेट नक्कीच मुलाच्या बॅगला असावेत. जेणेकरुन त्यामध्ये पाण्याची बॉटल ठेवता येईल.
वॉटरप्रुफ बॅग
काही लोक बॅग खरेदी करताना ही गोष्ट लक्षात ठेवा की, ती नेहमीच वॉटरप्रुफ असावी. खासकरुन पावसाळ्याचा दिवसात बॅग भिजण्याची शक्यता असते. जर बॅग वॉटरप्रुफ असेल तर पुस्तक ही भिजणार नाहीत.
हेही वाचा- प्लास्टिकचे ग्लास फेकून देऊ नका, तर करा ‘असा’ वापर