घरताज्या घडामोडीडेंग्यूचा नायनाट करण्यासाठी संशोधकांनी जन्माला घातला 'जीएम डास'

डेंग्यूचा नायनाट करण्यासाठी संशोधकांनी जन्माला घातला ‘जीएम डास’

Subscribe

डेंग्यू रोखण्यासाठी संशोधकांनी कृत्रिम डास तयार केला आहे.

गेल्या काही वर्षात जगभरात डेंग्यूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे डेंग्यूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी संशोधकांनी प्रतीजैविकांची निर्मितीही केली. मात्र डेंग्यूचा नायनाट काही झाला नाही. यामुळे अमेरिकेतील ‘सॅन डिएगो कॅलिफोर्निया आणि वांटरबिल्ट विद्यापीठा’च्या संशोधकांनी चक्क कृत्रिम डासांनाच जन्म दिला आहे. जेनेटिकली मॉडिफाईड (जीएम) असे त्याला नाव देण्यात आले आहे. वैद्यकिय मासिक ‘पीएलओएस पॅथोजंस जर्नल’मध्ये या संशोधनावर आधारित लेखात ही माहिती देण्यात आली आहे.

प्रामुख्याने डेंग्यूचे विषाणू हे एडिस या मादी डासाच्या डंखातून शरीरात प्रवेश करतात. यामुळे या नवीन प्रकारच्या कृत्रिम डासांची निर्मिती करण्यात आली. त्या डासांच्या शरीरात डेंग्यूच्या विषाणूंना निष्क्रिय करण्याची क्षमता असलेली विशिष्ट प्रतीजैविके सोडण्यात आली होती. जेणेकरून एडिस मादीचा या कृत्रिम डासांशी संपर्क होताच तिच्या शरीरातील डेंग्यूचे विषाणू निष्क्रिय झाले. त्यानंतर काहीवेळातच एडिस मादीचा मृत्यू झाला. हे पाहता लवकरच डेंग्यूचे विषाणूच लुप्त होतील असा दावा सॅन डिएगो कॅलिफोर्निया आणि वांटरबिल्ट विद्यापीठाचे संशोधक प्रमुख उमर अकबरी यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -