मानवी शरीरात सापडला ‘हा’ नवीन अवयव, करतो सर्वात महत्त्वाचे कार्य

Scientists ‘New’ Organ in Human Body discovered anatomy important function
मानवी शरीरात सापडला 'हा' नवीन अवयव, करतो सर्वात महत्त्वाचे कार्य

मानवी शरीरात एका नवीन अवयवाचा शोध लागला आहे. या अवयवाचा सविस्तर अभ्यास यापूर्वी कधीही झाला नव्हता. हाअवयव आपल्या तोंडाच्या खालच्या जबड्याच्या शेवटी आढळला आहे. ज्याच्या मदतीने आपल्याला जबडा हलवता येतो. हा मॅसेटरच्या आत असलेल्या अवयवांचा एक जाड थर आहे. यामुळे कोणतीही गोष्ट चघळताना खालचा जबडा वर आणि खाली हलवण्यास मदत होते. चला या नवीन अवयवाबद्दल समजून घेऊया..

आधुनिक शरीरशास्त्राच्या पुस्तकांमध्ये असे लिहिले आहे की, मॅसेटर अवयवामध्ये दोन स्तर असतात. एक जाड आणि दुसरा पातळ. परंतु काही ऐतिहासिक वैद्यकीय दस्तऐवजांमध्ये असे आढळून आले की, मॅसेटरमध्ये अवयवांचे तीन थर असू शकतात. मात्र तिसरा थर कुठे आहे याची कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

या नवीन अवयवाचा शोध घेणारा अहवाल नुकताच एनल्स ऑफ एनाटॉमी या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. म्हणूनच शास्त्रज्ञांच्या एका टीमने आता या नवीन अवयवावर अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. यातून अनेक ऐतिहासिक कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. तसेच अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी १२ मानवी मृतदेहांच्या डोक्याची चिरफाड केली.

ही डोकी फॉर्मलडीहाइडमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली होती. यानंतर नवीन १६ मृतांच्या शरीराचे सीटी स्कॅन करण्यात आले. त्यानंतर काही जिवंत माणसांच्या जबड्यांचा एमआरआय करण्यात आला. तपासणी केल्यावर असे आढळून आले की, जबड्याच्या मागील भागात आणखी एक जाड थर आहे. मात्र हा थर इतर दोन थरांपेक्षा वेगळा आहे. हा अवयव प्रत्यक्षात हाडासारखा दिसतो.

हाडासारख्या दिसणाऱ्या या अवयवाच्या आजूबाजूला हाडचं आहेत. ज्याला चीक्स बोन्स म्हणतात. ही हाडं कानाजवळ समोरच्या बाजूला स्थित आहे. शास्त्रज्ञांना खालच्या जबड्याच्या अगदी वर त्रिकोणी आकारात एक फुगवटा देखील आढळला, जो या नवीन अवयवामुळे तयार होतोय.

स्वित्झर्लंडमधील युनिर्व्हसिटी ऑफ बेसेलमध्ये बायोमेडिसिन विभागातील सिनियर लेक्चरर आणि या संशोधनाच्या प्रमुख संशोधन कर्त्या झिल्व्हिया मॅजी यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही मॅसेटर अवयवाबद्दल डिसेक्शन केले तेव्हा त्यांना तिन्ही स्तर स्पष्टपणे दिसू लागले. दोन वरच्या बाजूला आणि तिसरा आतल्या बाजूला. हा अवयव खालचा जबडा उचलण्यास, ओढण्यास आणि हलविण्यास मदत करतो.

झिल्व्हिया मॅजी म्हणाल्या की नवीन अवयव हा मॅसेटर अवयवातील एकमेव अवयव आहे ज्यामुळे जबड्याचे हाड मागे खेचण्यास मदत होते. युनिव्हर्सिटी सेंटर फॉर डेंटल मेडिसिन बेसेलचे प्रोफेसर डॉ. जेन्स क्रिस्टोफ टार्प म्हणाले की, १०० वर्षांपासून या गोष्टीचा अभ्यास केला जात होता आणि त्याचा शोध लावला जात होता, परंतु या अवयवाचा शोध लागला नव्हता. एखाद्या जीवशास्त्रज्ञाने कशेरुकाची नवीन प्रजाती शोधून काढल्यासारखे हे संशोधन आहे.

या नवीन अवयवाला Musculus masseter pars coronidea असे नाव देण्यात आले आहे. सामान्य भाषेत मॅसेटरचा कोरोनॉइड भाग असे म्हणतात. हा शोध यासाठी महत्त्वाचा आहे कारण डॉक्टर आणि शास्त्रज्ञ आता जबड्याच्या अवयवांवर अधिक अभ्यास करू शकतील.

या अवयवाचा अभ्यास केल्यानंतर, डॉक्टर अधिक चांगली शस्त्रक्रिया करू शकतील. जेणेकरून जबड्याचा हा भाग चांगला मानून तो लोकांना विविध प्रकारच्या आजारांपासून मुक्त करू शकेल. कारण हा अवयव जबडा आणि कवटीला जोडलेला आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे.


पिंपरी चिंचवडमध्ये तरुणावर गोळीबार, सीसीटीव्हीत गोळीबाराची घटना कैद