अंडरगारमेंट पर्सनल आणि इंन्टिमेंट हाइजिनचा एक महत्त्वाचा हिस्सा आहे. कपड्याचे फॅब्रिक, त्याचा रंग आणि स्टाइल तुमची आवड आणि मूड बद्दल सांगते. आरामदायी रविवारसाठी बहुतांशजणी सैल कपडे घालतात. मात्र जेव्हा आपण एखादा पार्टी वेअर ड्रेस किंवा जिमला जाताना स्लीमलेस कंम्फर्टेबल पँन्टी घालतो. मात्र तुम्हाला माहितेय का, अशा सिंथेटीक पँन्टीमुळे युटीआय किंवा अन्य योनि संक्रमणाची समस्या उद्भवू शकते.
काही वेळेस शिलाई नसलेले स्लीमलेस पँन्टीसाठी सिंथेटिक कापडाचा वापर केला जातो. कारण कॉटन अंडरगार्मेंट सिंथेटिक कापडाप्रमाणे परफेक्ट आकार घेत नाही. अशातच दररोज सिंथेटिक पँन्टी घालणे योग्य आहे का? खरंतर सिंथेटिक कपडे हे इको फ्रेंन्डली किंवा बॉडी फ्रेंन्डली नसतात.
पॉलिस्टर किंवा लेस सारख्या सिंथेटिक कापडापासून तयार करण्यात आलेल्या पँन्टीमुळे योनिच्या येथे हवा खेळती राहत नाही. सिंथेटिक अंडरवेअर शरिरातील संपूर्ण घाम शोषला जातो आणि ओलसरपणा सुकला जात नाही. याच कारणास्तव त्वचा गरम होऊ शकते.
त्यामुळे एक्सपर्ट्स असे म्हणतात की, कॉटन पँन्टीचा नेहमी वापर केला पाहिजे. जेणेकरुन तुमच्या योनिच्या ठिकाणी हवा खेळती राहिल. अन्यथा तेथे ओलसरपणा तयार झाल्यास इंन्फेक्शन आणि अन्य समस्या होऊ शकतात.
मात्र वर्कआउट करताना सुती अंडरवेअरमुळे समस्या उद्भवू शकते. कारण हे कापड अधिक घामामुळे शरिरावर चिकटले जाते. जर तुमच्याकडे कॉटन किंवा सिंथेटिक या दोन्ही अंडरवेअर नसतील, तुम्ही पर्यायी पँन्टीजचा वापर करू शकता. मात्र पुढील काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
-आपल्या अंडरवेअर सुंगधित डिटर्जेंटने धुवू नये.
-नव्या अंडरवेअर लगेच घालू नका, त्या वॉश करुनच घाला
-जिम किंवा वर्कआउट करण्यासाठी अतिघट्ट अँडरवेअर वापरू नका
-जर तुम्हाला आधीपासूच रॅशेज, खासची समस्या असेल तर सीमलेस अंडरवेअर अजिबात घालू नका
हेही वाचा- हेव्ही ब्रेस्टसाठी ‘या’ आहेत परफेक्ट ब्रा