Friday, April 19, 2024
घरमानिनीRelationshipSeparation Marriage नक्की काय? जपानमध्ये वाढतोय ट्रेंन्ड

Separation Marriage नक्की काय? जपानमध्ये वाढतोय ट्रेंन्ड

Subscribe

जगभरात लग्न मोडतायत पण जापानमध्ये एक अनोखा प्रयोग याच बद्दल केला गेलाय. येथे सेपरेशन मॅरेजचा ट्रेंन्ड वाढू लागला आहे. यामध्ये कपल एकाच शहरात राहत असले तरीही वेगवेगळे राहतात आणि विकेंड्सला भेटतात. असे मानले जात आहे की, यामुळे तणाव आणि घटस्फोटाचा दर ही कमी होऊ शकतो. जपानच्या लोकांनी याला ‘सोत्सुकॉन’ म्हणजे कायदेशीर रुपात लग्न करायचे पण आयुष्य जगण्याचे स्वातंत्र्य दिले जाते.जपान मधील या ट्रेंन्डवरुन वाद ही झाला. असा ही आरोप लावला गेला की, हे घर मोडण्यासारखा विचार आहे.

सोत्सुकॉन किंवा सेपरेशन मॅरेज म्हणजे ज्यामध्ये विवाहित जोडपं कायदेशीर लग्न झाले तरीही वेगळे राहतात. यामागील कारण असे नाही की तणावाची स्थिती असते. पण दोघांना त्यांचे आयुष्य जगण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. ते कोणत्याही वादाशिवाय राहण्यास तयार होतात. एक कपल वेगवेगळे घर घेईन किंवा वेगवेगळ्या शहरात राहतात.

- Advertisement -

या नात्यात सुद्धा पार्टनर एकमेकांशी इमोनली कनेक्ट असतात. ते दोघांचा खर्च एकमेकांमध्ये वाटून घेतात. हे सर्वकाही विकेंड्सला होतो. सेपरेशन मॅरेजमधअये कपल एका ठरवलेल्या कालांतराने भेटतात आणि दोन-चार दिवस एकत्रित घालवतात. या दरम्यान ते सर्व गोष्टी एकमेकांशी शेअर करतात. जर मुलं असतील तर त्यांच्या शिक्षणाबद्दल ही विकेंडलाच बोलले जाते. पण जेव्हा आपत्कालीन स्थिती निर्माण होते तेव्हा कपल भेटतात.

- Advertisement -

सेपरेशन मॅरेजसाठी जपानमध्ये कोणतीही लीगल टर्म नाही. जपानी सिविल कोडच्या आर्टिकल 752 नुसार नवरा-बायको एकत्रित राहतात आणि एकमेकांना सपोर्ट करतात. परंतु या कायद्यात हे सुद्धा सांगितले गेलेय की, नोकरी किंवा अन्य काही कारणांमुळे वैवाहिक कपल वेगवेगळे राहिले तरीही कायदेशीर रुपात ते वैवाहिकच असतात. यामध्ये काही वेगळे नियम नसल्याने त्यात कायदेशीर समस्या सुद्धा उद्भवत नाहीत.

या नात्यात मुलांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी ही आईचीच असते. जापान मध्ये असे मानले जाते की, आई सोबत राहणारी मुलं ही मानसिक आणि शारिरीक रुपात अधिक उत्साही असतात. अशातच सेपरेशन मॅरेजमध्ये सुद्धा मुलं ही आई सोबतच राहतात. पण वडिल हे त्यांचे कर्तव्य पार पाडतात. जसे की, मुलांना शाळेत सोडणे, होमवर्क करणे. पण या दरम्यान ते बायकोशी कोणताही संपर्क करत नाही.


हेही वाचा- Sleep Divorce वेळी कपल्स फॉलो करतात हे खास नियम

- Advertisment -

Manini