Monday, April 15, 2024
घरमानिनीसेक्शुअल हॅरॅसमेंट आणि महिला

सेक्शुअल हॅरॅसमेंट आणि महिला

Subscribe

जग स्त्रिया आणि मुलींच्या बाबतीत लोक म्हणतात तितकं सरळ नाहीय. अनेक प्रसंगी ती घरात आणि शाळांमध्ये हिंसाचार आणि सेक्शुअल हॅरॅसमेंटची शिकार होत आहे. हातांना स्पर्श करणे, शरीराकडे एकटक पाहणे यासारखे अनेक अनुभव आपल्यापैकी अनेक महिलांना आले असतील. आपल्या आजूबाजूला असे अनेक प्रकार घडताना आपण पाहिले सुद्धा असतील. त्यामुळे प्रत्येक महिलेने आयुष्याच्या प्रत्येक वयात आणि टप्य्यावर सेक्शुअल हॅरॅसमेंटचा सामना करण्यासाठी तयार असले पाहिजे.

सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणजे काय?
संमतीशिवाय होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या लैगिंक छळांना सेक्शुअल हॅरॅसमेंट असे म्हणतात. थोडक्यात कोणतीही अनिष्ट लैगिंक वर्तवणूक, लैगिंक स्वभावाचे इतर शाब्दिक किंवा शारीरिक आचरण होय. हे ऑफिस, शाळा, कॉलेज, सार्वजनिक ठिकाण, वाहतूक आणि ऑनलाईन अशा वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकते. सेक्शुअल हॅरॅसमेंट केवळ महिलाच नाही तर पुरुषांच्या बाबतीतही घडते.

- Advertisement -

सेक्शुअल हॅरॅसमेंट आणि सेक्शुअल अब्युज यात फरक काय?
सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणजे अनिष्ट आणि अयोग्य लैगिंक वर्तन. यामध्ये शाब्दिक, शारीरिक आणि दृश्य हालचालींचा समावेश असतो. यात लैगिंक टिपण्या, हातवारे किंवा तत्सम वर्तन यांचा समावेश असू शकतो. तर सेक्शुअल अब्युज म्हणजे एक प्रकारचे शारीरिक कृत्य. यात संमतीशिवाय लैगिंक कृत्यांचा समावेश होतो. ज्यामुळे पीडित व्यक्तीला हानी पोहचू शकते. यात बलात्कार विनयभंग, अवांछित स्पर्श, बळजबरी यासारख्या कृत्याचा समावेश असतो.

सेक्शुअल हॅरॅसमेंट मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो?
सेक्शुअल हॅरॅसमेंटमुळे चिंता, पॅनिक अटॅक,नैराश्य आणि पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर होण्याची शक्यता अधिक असते. तज्ज्ञांच्या मते, सेक्शुअल हॅरॅसमेंटचे शिकार झालेल्या लोकांना जेव्हा योग्य मार्गदर्शन आणि उपचार मिळत नाही. तेव्हा या मानसिक समस्यांना बळी पडतात.

- Advertisement -

सेक्शुअल हॅरॅसमेंटमधून स्वतःला कसे सावराल?
सेक्शुअल हॅरॅसमेंटचा अनुभव घेणारे बहुतेक लोक त्यांची परिस्थिती उघड न करण्याचा पर्याय निवडतात. मात्र, अशा लोकांनी या अनुभवांना खुलेपणाने सामोरे जावे. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, शांत राहण्यामुळे समस्या कमी होण्याऐवजी वाढते. झालेल्या घटनेबद्दल बोलणे काही प्रमाणात आघात हाताळण्यास मदत करू शकते.

सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या आघातावर मात कशी मिळवाल?

त्याबद्दल बोला – सेक्शुअल हॅरॅसमेंट वेदनादायी असते. बहुतेकदा पीडित व्यक्ती तिच्यासोबत जे घडले आहे ते व्यक्त करण्यापासून किंवा त्याच्या भावना व्यक्त करण्यापासून माघार घेते किंवा संकोच करते. पण, त्याबद्दल बोलणे महत्वाचे आहे. उत्तम मानसिक आरोग्यासाठी दडपलेल्या भावनांना सामोरे जाणे गरजेचे आहे.

राग आणि निराशा व्यक्त करा – जर तुमच्याबाबतीत असे काही घडल्यास तुम्ही लगेचच बोलू न शकल्यास तुम्ही मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि समस्या सोडविण्यासाठी डायरी, ई-मेल मेसेजस चा वापर करू शकता. झालेल्या घटनेचा राग व्यक्त न केल्यास किंवा ती न बोलल्यास मनाची घुसमट व्हायला सुरुवात होते.

अहवाल फाईल करा – गुन्हेगाराची तक्रार अवश्य करा. अशा घटना लपवून न ठेवता त्यांना सामोरे जायला हवे. तरच अशा घटनांना आळा बसू शकेल. त्यामुळे तक्रार करून दोषींवर कारवाईची मागणी करा.

मानसोपचारतज्ज्ञांची मदत – मानसिक उपचारांची गरज अत्याचाराच्या तीव्रतेवर अवलंबून असते. तुम्हाला त्या घटनेतून बाहेर निघणे असह्य वाटतं असेल तर तुम्ही मानसोपचारतज्ञ यांची मदत घेऊ शकता.

स्वतःला दोष देऊ नका – जे झाले आहे, त्यात माझी चूक आहे. हा विचार करणे आधी सोडा. आघातातून बरे होण्यासाठी आणि सकारात्मकपणे पुढे जाण्यासाठी स्वतःला सक्षम बनवा.

व्यक्त व्हा – ऑक्टोबर २०१७ मध्ये सेक्शुअल हॅरॅसमेंट आणि सेक्शुअल अब्युजच्या मुद्यांबद्दल जागरूकता निर्माण होण्यासाठी हॅशटॅग म्हणून सुरु झालेल्या मी टू मुळे अनेक महिला व्यक्त झाल्या. ज्यामुळे अनेक महिलांना पुढे येण्यास मदत झाली.

 

 


हेही वाचा : 8 मार्च रोजी महिला ‘या’ ठिकाणी करू शकतात मोफत प्रवास!

 

- Advertisment -

Manini