लग्नाला जायला प्रत्येकालाच फार आवडतं. परंतु हिवाळ्यात जर लग्नसमारंभ असेल तर मात्र आपल्याला कपडे कसे स्टाईल करावेत हा प्रश्न पडतो. कारण जेव्हा थंडीचा विषय निघतो. तेव्हा आपण आपल्या सुंदर अशा आऊटफिटवर स्वेटर घालू शकत नाही. याने आपला लूक बिघडू शकतो. परंतु तुम्हाला वाटल्यास तुम्ही तुमच्या आऊटफिटवर शालदेखील घालू शकता. शाल घातल्याने तुमचा लूक अॅट्रेक्टिव्ह दिसू शकेल. जाणून घेऊयात शाल ड्रेप करण्याचे काही नवे पर्याय. जे वापरून तु्म्ही वेगवेगळ्या आऊटफिटसोबत तुमची शाल ड्रेप करू शकता.
दुपट्टा स्टाईल :
जर तु्म्ही सूट घालत असाल तर त्यावर दुपट्टा घेण्याऐवजी तुम्ही शाल घेऊ शकता. शाल घेतल्यामुळे तुम्हाला कमी थंडी लागेल. सोबतच तुमचा लूकदेखील आकर्षक दिसू लागेल. यासाठीच प्रयत्न करा की तुमची शाल ही तुमच्या सूटच्या रंगाच्या कॉन्ट्रास्ट रंगांमध्ये असेल. एका बाजूच्या खांद्यावर ही शाल पिनने सेट करून घ्या. व दुसऱ्या हातावर तिला लपेटून पिन करा. यामुळे तुम्हाला दुपट्टा स्टाईल करण्याची गरज पडणार नाही. अशाप्रकारच्या शाल तुम्हाला बाजारात सहज मिळू शकतील.
वेस्टर्न आऊटफिटसोबत करा स्टाईल :
जर तुम्ही लग्नासाठी वेस्टर्न आऊटफिट घालणार असाल तर तुम्ही शालच्या निऱ्या बनवून त्यांना बेल्टच्या सहाय्याने सेट करू शकता. आणि तुमच्या लूकला एक इंडो वेस्टर्न टच देऊ शकता. यामुळे तुमचा लूक आणखी सुंदर दिसू शकेल. प्लेन ड्रेससोबत तुम्ही प्रिंटेड शाल स्टाईल करू शकता.
श्रग स्टाईल :
तुम्ही श्रग स्टाइलमध्ये किंवा इंडो वेस्टर्न आऊटफिटमध्ये देखील शाल स्टाईल करू शकता. यासाठी शाल त्रिकोणी आकारात ड्रेप करा. नंतर तिला दोन्ही खांद्यांवरून घेऊन पिन अप करा. लूक अधिक आकर्षक करण्यासाठी त्याला तुम्ही बेल्टही लावू शकता. यामुळे तुमचा लूक अधिकच सुंदर दिसेल. या आऊटफिटमध्ये तुम्हाला जास्त दागिने घालण्याची गरज लागणार नाही.
अशाप्रकारे या लग्नसराईच्या दिवसांमध्ये तुम्ही शाल घालू शकता. ज्यामुळे तुम्हाला कमी थंडी लागेल. आणि जास्त दागिन्यांशिवायही तुमचा लूक आकर्षक आणि सुंदर दिसू शकेल.
हेही वाचा : Fashion Tips : स्टाईल अपग्रेड करणारे आऊटफिट आणि ज्वेलरी
Edited By – Tanvi Gundaye