व्यायाम करण्यासाठी जिममध्ये जावं की पार्कमध्ये जावं? या टिप्स नक्की वाचा

प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्यासाठी, स्वतःसाठी रोज ठराविक वेळ काढून व्यायाम केला पाहिजे. प्रत्येकजण आपल्या कामात कितीही व्यस्त असल्या तरीही व्यायामासाठी वेळ काढलाच पाहिजे असं तज्ञ सुद्धा सांगतात.

मंडळी उत्तम आरोग्याचं रहस्य हे जसं सकस आहारात असतं त्याच प्रमाणे व्यायाम सुद्धा उत्तम आरोग्यासाठी महत्वाचा असतो. व्यायाम शरिराला निरोगी ठेवतो त्याप्रमाणे व्यायाम केल्याने मानसिक आरोग्य सुद्धा उत्तम राहतं. सध्याच्या धावपळीच्या युगात आणि कामाच्या गडबडीत उत्तम आरोग्य राखणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात बरीच मंडळी स्वतःच्या फिटनेस बाबतीत जागरूक झाली आहेत. पण व्यायाम कारण्यासाठी जिम मध्ये जावं की एखाद्या पार्कमध्ये जावं असा प्रश्न अनेकांना पडतो. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या.

हे ही वाचा – ऑफिसमध्ये काम करताना खूप झोप येते? मग करा ‘या’ 5 गोष्टी

रोज व्यायाम करणे महत्वाचे

प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्यासाठी, स्वतःसाठी रोज ठराविक वेळ काढून व्यायाम केला पाहिजे. प्रत्येकजण आपल्या कामात कितीही व्यस्त असल्या तरीही व्यायामासाठी वेळ काढलाच पाहिजे असं तज्ञ सुद्धा सांगतात. नियमित व्यायाम केला तर अनेक शारीरिक आणि मानसिक आजार होण्यापासून रोखता येऊ शकतात.

जिममध्ये व्यायाम करणे किती फायदेशीर असते?

जिममध्ये जाऊन व्यायाम करणे सुद्धा चांगलेच आहे. जिममध्ये जाऊन व्यायाम केला तर तिथे तुम्हाला ट्रेनरची मदत सुद्धा मिळेल. जेणेकरून तुम्ही व्यायामाचे वेगवेगळे प्रकार ट्रेनरच्य मार्गदर्शनाखाली करू शकता. तुम्ही अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम केला तर त्याचा तुम्हाला नाकीयच फायदा होईल.

हे ही वाचा – बेकिंग सोड्याने घ्या चेहऱ्याची काळजी; फॉलो करा ‘या’ टिप्स

पार्कात किंवा मोकळ्या वातावरणात व्यायाम करणे किती फायदेशीर?

मोकळ्या वातावरणात किंवा पार्कात व्यायाम करणे हे नेहमीच फायदेशीर असते. निसर्गाच्या सानिध्यात आणि ताजी हवा यामुळे तुमचा मूड सुद्धा फ्रेश होतो, मन प्रसन्न होतं. पार्कात व्यायाम केला तर सकाळची कोवळी सूर्यकिरणे सुद्धा व्हिटॅमिन डीची शरीरातील कमतरता भरून काढतात. आजकाल कोणत्याही पार्कमध्ये ओपन जिमचीही सुविधा असते.

हा ही वाचा – पार्टी, लग्नासाठी जाताय? मग अशी करा नेलपॉलिशची निवड

दोन्ही ठिकाणी व्यायाम कारण उत्तमच आहे. प्रत्येक जण स्वतःच्या सोईनुसार आणि आवडीनुसार जिम किंवा पार्कमध्ये जाऊन व्यायाम करू शकता