आपल्या स्वयंपाकघरातील अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे, फ्रिज तसेच गृहिणींच्या आयुष्यातील अविभाज्य भाग. भाजी, उरलेले अन्न, तापवलेले दूध इत्यादी बरेच पदार्थ ठेवण्यासाठी आपण फ्रिजचा वापर करतो. दिवसभरात असंख्यवेळा आपण फ्रिजचा वापर करतो. हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे बऱ्याच लोकांना फ्रिज बंद ठेवावं की नाही असा प्रश्न पडतो ? आज आपण जाणून घेऊयात, हिवाळ्यात फ्रिज बंद ठेवावं की नाही.
हिवाळ्यात फ्रिज बंद ठेवायचा की नाही, हे तुमच्या वापरावर आणि गरजांवर अवलंबून असते. तसेच तुम्ही हवामानानुसार तुमच्या फ्रिजचे तापमान कमी जास्त करू शकता.
फ्रिज बंद ठेवण्याचे फायदे
बचत होईल
जर तुम्ही फ्रिजचा फारसा उपयोग करत नसाल किंवा घरात फारसे अन्नसाहित्य साठवत नसाल, तर फ्रिज बंद ठेवल्याने ऊर्जेची देखील बचत होईल.
स्वच्छता
फ्रिज बंद ठेवल्यास त्यातील जमा झालेला बर्फ किंवा घाण काढणे देखील सोपे जाते. बऱ्याचदा फ्रिज साफ करायला खूप वेळ लागतो. अशावेळी तुम्ही जर फ्रिज बंद ठेवत असाल तर फ्रिज सहजपणे स्वच्छ करू शकता. वेळ देखील लागणार नाही.
फ्रिज हिवाळ्यात चालू ठेवण्याचे फायदे
अन्नाचा ताजेपणा टिकतो
हिवाळ्यातही अन्न लवकर खराब होण्याची शक्यता असते. फ्रिजमध्ये अन्न ठेवल्याने ते ताजे आणि सुरक्षित राहते.
दुग्धजन्य पदार्थ
दूध, दही, लोणी यांसारखे पदार्थ बाहेरच्या तापमानामुळे लगेच खराब होतात. फ्रिजमुळे हे पदार्थ दीर्घकाळ टिकतात.
फ्रिजच्या यंत्रणेचे संरक्षण
फ्रिज सारखं बंद केल्याने फ्रिजच्या यंत्रणेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. फ्रिज चालू ठेवल्यास त्याची कार्यक्षमता टिकून राहते. त्यामुळे फ्रिज हा सारखा चालू बंद करू नये अशाने फ्रिज लवकर खराब होऊ शकतो.
- जर तुम्ही रोज फ्रिजमध्ये अन्न ठेवत असाल, तर फ्रिज चालू ठेवणे आवश्यक आहे.
- जर फ्रिजचा वापर कमी करत असाल तर, तो बंद ठेवण्याचा विचार करू शकता.
- तुम्ही फ्रिजच्या गरजांवर लक्ष केंद्रित करून निर्णय घेऊ शकता.
हेही वाचा : Winter Health Tips : हिवाळ्यात डाएटमध्ये या फळांचा करा समावेश
Edited By : Prachi Manjrekar