Saturday, March 22, 2025
HomeमानिनीReligiousVastu Tips : बेडरुममध्ये आरसा लावायचा की नाही

Vastu Tips : बेडरुममध्ये आरसा लावायचा की नाही

Subscribe

बेडरूममध्ये आरसा लावायचा की नाही, हा प्रश्न वास्तुशास्त्र, फेंगशुई, आणि वैयक्तिक सोय या तिन्ही दृष्टीकोनातून पाहिला जाऊ शकतो. बरेच लोक बेडरुममध्ये आरसा ठेवतात. यामागचं कारण म्हणजे बेडरुमला मोठं आणि आलिशान लूक मिळत. तर काही वास्तुशास्त्र आणि फेंगशुई पद्धतीनुसार, आरसा चुकीच्या ठिकाणी असल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतो. त्यामुळे आरसा लावण्यापूर्वी त्याच्या फायदे आणि तोटे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आज आपण जाणून घेऊयात बेडरुममध्ये आरसा लावायचा की नाही.

बेडरुममध्ये आरसा लावण्याचे फायदे

  • आरसा लावण्याचा मुख्य फायदा म्हणजे आपण जेव्हा तयार होतो त्यावेळी हा आरसा खूप उपयोगी येतो.
  • लहान बेडरूम असेल तर आरशामुळे तुमची रूम मोठी आणि प्रकाशमान वाटते.
  • योग्य ठिकाणी लावल्यास नैसर्गिक प्रकाश परावर्तित होऊन रूममध्ये उजेड येतो.

आरसा लावण्याचे तोटे

बेडसमोर आरसा ठेवू नये

बेडसमोर आरसा ठेवू नये असे मानले जाते की झोपताना आरशात आपलं प्रतिबिंब दिसल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते आणि झोपेत व्यत्यय येऊ शकतो.

तणाव आणि अस्थिरता वाढू शकते

फेंगशुईनुसार, आरसा चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास वैवाहिक किंवा मानसिक तणाव वाढू शकतो.

अवास्तव भीती किंवा भ्रम वाटू शकतो

रात्री अचानक आरशात प्रतिबिंब दिसल्यास भीती वाटू शकते.

आरसा कसा आणि कुठे लावावं

  • आरसा कधीही बेडच्या समोर नसावा.
  • बेडच्या डोक्याच्या बाजूला किंवा बाजूला ठेवू शकता, पण थेट प्रतिबिंब दिसणार नाही याची काळजी घ्या.
  • आरशाला पडदा असेल तर तो तुम्ही रात्री झाकू शकता.
  • आरसा ठेवताना एक गोष्टीची काळजी घ्या आरसा अशा ठिकाणी ठेवा जिथे प्रकाश थांबला जाणार नाही

जर तुम्हाला फक्त उपयोगासाठी आरसा हवा असेल, तर वॉर्डरोबच्या आत किंवा एका बाजूला ठेवणे अधिक चांगले. तुम्हाला वास्तुशास्त्र आणि फेंगशुई पाळायचे असल्यास, बेडच्या समोर आरसा टाळावा.

हेही वाचा : Vastu Tips : या वस्तू घरात चुकूनही ठेवू नयेत


Edited By : Prachi Manjrekar

Manini