आपली त्वचा सुंदर आणि ग्लोइंग दिसण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. फेस मास्क स्क्रब किंवा चेहऱ्यावर ब्लीच करतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का चेहऱ्यावर ब्लीच करण्याचे फायदे जसे आहेत तसे साइड इफेक्ट्स देखील आहेत. आज आपण जाणून घेऊयात, चेहऱ्यावर ब्लीच करण्याचे काही साइड इफेक्ट्स.
त्वचेवर ब्लीच केल्याने त्वचा कशी खराब होते ?
ब्लीचमध्ये असलेले रसायने त्वचेला हानी पोहोचवतात. ब्लीच केल्याने त्वचा जळू शकते, चेहऱ्यावर बारीक रेषा आणि सुरकुत्या येऊ शकतात. हळूहळू त्वचा खराब होऊ लागते.
त्वचेवर ब्लीच करण्याचे नुकसान
त्वचेवर खाज सुटणे
ब्लीच केल्यामुळे त्वचेवर खाज सुटू शकते. लाल रंगाचे डाग पडू शकतात. जळजळ आणि सूज येण्याची समस्या उद्भवू शकते एलर्जी होण्याची शक्यता वाढते.
पुरळ येणे
हे ब्लीच क्रीममुळे होते.ब्लीच क्रीममध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्सचा वापर केला असेल तर चेहऱ्यावर पुरळ येऊ लागतात. व्हाईटहेड्स, लाल ठिपके, ब्लॅकहेड्स आणि मुरुमांचे चट्टे चेहऱ्यावर हळूहळू येऊ लागतात.
त्वचेचे आजर
चेहऱ्यावर ब्लीच केल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते. ब्लीचमध्ये असलेल्या रसायनांमुळे त्वचेला जळजळ, रैशेस, जळजळ होणे, बारीक फोड येणे, खाज सुटणे, चुरचुरणे वगैरे समस्या निर्माण होऊ शकतात.
चेहऱ्यावरील नैसर्गिक तेल निघून जाते
आपल्या चेहऱ्यावरील नैसर्गिक तेल निघून ज्यामुळे तुम्ही त्वचा कोरडी राहते आणि जळजळ होऊ शकते.
त्वचा संवेदशील होते
जर तुम्ही वारंवार चेहऱ्यावर ब्लीच करत असाल तर तुमची त्वचा खूप संवेदशील होईल. तुम्हाला सहजपणे त्वचेचे कोणतेही आजार होऊ शकतात .
चेहऱ्यावर ब्लीच करण्याबाबत काही गोष्टी
- संपूर्ण त्वचेचा टोन बदलण्याचा प्रयत्न अनेकदा जास्त धोकादायक ठरू शकतो.
- त्वचा जास्त संवेदनशील असेल त चांगल्या दर्जाची ब्लीच उत्पादने खरेदी करावीत.
- त्वचा हायड्रेटेड आणि थंड ठेवण्यासाठी कोरफड जेल लावू शकता.
हेही वाचा : Beauty Tips : आयब्रो केल्यानंतरची सूज घालवा या उपायांनी
Edited By : Prachi Manjrekar