आपण काय खातो? कसा आहार घेतो? याचा आपल्या संपूर्ण शरीरावर खोलवर परिणाम होतो. तुम्ही संतूलित आहार केल्यास आरोग्य निरोगी राहते. याउलट अस्वास्थकर, प्रोसेस फूड, अतिरीक्त साखर असलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. विशेष करून, महिलांसाठी जास्त गोड पदार्थ अनेक आजारांना निमंत्रण देणारे ठरू शकते. जाणून घेऊयात, जास्त साखर खाण्याचे दुष्परिणाम,
जास्त साखर खाण्याचे दुष्परिणाम –
- डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, महिलांनी साखरेचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते. यामुळे इन्सुलिन आणि इस्ट्रोजेनच्या लेव्हलवर परिणाम होण्यास सुरूवात होते.
- महिलांच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यास PCOS, अनियमित पिरीयड आणि प्रजनन क्षमता यासंदर्भातील समस्या उद्भवतात.
- तुमच्या वाढत्या वजनाच्या समस्येला वाढते वजन कारणीभूत ठरू शकते. साखरेत असणाऱ्या कॅलरीज लठ्ठपणाला कारणीभूत ठरतात.
- जास्त साखरेचे पदार्थ खाल्ल्याने ब्रेस्ट कॅन्सर आणि सांधेदुखीच्या समस्या सुरू होतात.
- जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने आतड्यात असलेले बॅक्टेरियाचे संतूलन बिघडू शकते, ज्यामुळे पचनक्रियेवर विपरित परिणाम होतो.
- जास्त साखरेचे पदार्थ खाल्ल्याने मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवतात.
- जास्त साखरेचे पदार्थ खाल्ल्याने पोटात जळजळ निर्माण होऊ शकते. ज्याचा परिणाम शरीरातील पेशींवर होतो आणि पेशी खराब होतात.
- जास्त साखरेचे पदार्थ खाल्ल्याने हृदयाशी संबंधित तक्रारी उद्भवतात.
- साखरेचा केवळ आरोग्यावरचं नाही त्वचेवरही विपरीत परिणाम होतो. त्वचेच्या समस्येशी संबंधित समस्या जसे की, मुरुम, त्वचा काळी पडणे अशा तक्रारी सुरू होतात.
- जास्त साखरेचे सेवन अकाली वृद्धत्वाचे कारण ठरू शकते.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे जास्त साखरेचे सेवन डिलिव्हरी दरम्यान वंध्यत्व, गर्भपात होण्याचे कारण ठरू शकते.
- अतिरीक्त साखर मूड स्विंग्सचे कारण ठरू शकते.
- साखरेचे जास्त सेवन अल्झायमरचा धोका निर्माण करते. अल्झायमरमुळे मेंदूची ग्लूकोज प्रक्रिया निर्माण करण्याची क्षमता कमी करते.
- साखरेच्या अतिसेवनामुळे डायबिटीसचा धोका निर्माण होतो.
हेही पाहा –