Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीMobile Side Effects - झोपताना मोबाईल जवळ ठेवण्याचे हे आहेत धोके

Mobile Side Effects – झोपताना मोबाईल जवळ ठेवण्याचे हे आहेत धोके

Subscribe

सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल ही काळाची गरज झाले आहे. शाळेचा अभ्यास असो कि ऑफिसचे काम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण मोबाईल वापरू लागले आहेत. जेवणापासून ते रात्री झोपेपर्यंत मोबाईल जवळ बाळगण्याची सगळ्यांनाच सवय लागली आहे. यामुळे अनेकजण रात्री झोपतानाही मोबाईल उशीखाली किंवा बाजूला ठेवून झोपतात. ज्याचे नकारात्मक परिणाम व्यक्तीच्या शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यावरही होऊ शकतात. यामुळे मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येकाला मोबाईल वापरण्याच्या दुष्परिणामांचीही माहीती असणे आवश्यक आहे. जेणेकरून वेळीच सावध होऊन पुढील अनर्थ टाळता येणं शक्य आहे.

मोबाईल किती अंतरावर ठेवावा?

मोबाईल कधीही डोक्याजवळ उशीखाली किंवा बेडसाईटवर ठेवून झोपू नये. त्याऐवजी झोपताना मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवावा . ते ही शक्य नसेल तर ज्या खोलीत झोपत आहात त्या खोलीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या टेबलवर फोन ठेवू शकता.

जर मोबाईल दुर ठेवणे शक्यच नसेल तर तो एअरप्लेन मोडवर ठेवावा.

कारण तज्त्रांच्या मते बेड शेजारी फोन ठेवून झोपल्याने तणाव निर्माण होऊ शकतो.

मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनचा तुमच्या मेंदूच्या स्नायूंवरही वाईट परिणाम होतो.

ज्यावेळी व्यक्ती टेन्शनमध्ये असतो आणि मोबाईल डोक्याजवळ ठेवून झोपतो तेव्हा डोकेदुखीबरोबरच टेन्शन वाढते.

कारण मोबाईल रेडीएशनचा परिणाम मेंदूवर सातत्याने होत असतो. पण स्ट्रेस आल्यास तो अधिक प्रभावी होतो.

Manini