दिवसभराच्या थकव्यानंतर प्रत्येकाला रात्रीची शांत झोप हवी असते. चांगल्या आणि शांत झोपेसाठी स्ट्रेस फ्री असणे आणि योग्य लाइफस्टाइल फॉलो करणे आवश्यक असते. यासोबतच शांत झोपेसाठी स्वच्छ बेडशीट आणि उशांचे स्वच्छ कव्हर असणे गरजेचे आहे. कारण जर तुम्ही अस्वच्छ, मळलेल्या उशीवर झोपलात तर झोपेवर नक्कीच परिणाम होऊ शकतो. मळलेल्या उशीवर झोपल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या उशांवर बुरशी, बॅक्टेरिया आणि धुळीचे कण जमा असतात. अशा परिस्थितीत आपण त्याच उशीवर झोपल्यास त्यावरील बॅक्टेरिया, जंतू शरीरात प्रवेश करतात आणि आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. मळलेल्या उशीवर झोपल्याने कोणत्या समस्या उद्भवतात जाणून घेऊयात,
- मळलेल्या उशीवर झोपल्याने चेहऱ्यावर मुरुमे, व्हाइटहेड्स, त्वचेची जळजळ आणि तीव्र खाज येणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यात जर तुमची त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर एक्झिमासारख्या धोकादायक समस्या निर्माण होऊ शकतात.
- डॉक्टरांच्या मते, जर तुम्ही आठवडाभर बेडशीट आणि उशांचे कव्हर धुतले नाही तर त्यावर असंख्य बॅक्टेरिया जमा होतात. या बॅक्टेरियांमुळे न्यूमोनिया सुद्धा होऊ शकतो. यासह त्वचेवर पुरळ किंवा जास्त खाज येणे यासारख्या त्वचेच्या तक्रारी सुरू होतात.
- मळलेल्या उशांवर झोपल्याने ऍलर्जी होऊ शकते. यामुळे सतत शिंका येणे किंवा श्वास घेण्यास अडचणी येऊ शकतात. सतत शिंका आल्याने झोपेत व्यत्यय निर्माण होऊ शकतो.
- मळलेल्या उशा आणि बेडशीटवर झोपल्याने स्ट्रेस निर्माण होतो. खरं तर हे कोणाला न पटण्यासारखे आहे. पण, ही गोष्ट खरी आहे. मळलेली बेडशीट आणि उशा यांचा स्ट्रेसशी संबंध आहे. जेव्हा उशीवरील बेड बग्ज्मुळे झोपेत व्यतय येऊन झोप पूर्ण होत नाही. तेव्हा अपुऱ्या झोपेमुळे स्ट्रेस निर्माण होतो.
- मळलेल्या बेडशीटवरील घाणीचे कण शरीरात जातात, ज्यामुळे झोपवर परिणाम होतो. वारंवार तुमचे झोपेचे चक्र बिघडल्यास तुम्हाला झोपेशी संबंधित आजार होऊ शकतात.
- एकदंरच, गाढ आणि शांत झोपेसाठी तुमची बेडशीट आणि उशी स्वच्छ ठेवा. दर 3 ते 5 दिवसांनी बेडशीट आणि उशांचे कव्हर बदलावेत, असे तज्ञ सांगतात.
हेही पाहा –