Tuesday, January 21, 2025
HomeमानिनीBaby care Tips : मुलांना सतत डायपर घालणे सुरक्षित आहे का?

Baby care Tips : मुलांना सतत डायपर घालणे सुरक्षित आहे का?

Subscribe

नवजात बाळाची काळजी घेणे तारेवरच्या कसरतीप्रमाणे असते. बाळाला केव्हाही भूक लागते, केव्हाही सू सू होऊ शकते. अशा वेळी बरेच पालक बाळांसाठी डायपर घालतात. डायपरमुळे पालकांचे काम थोडे हलके होते. वारंवार बाळाने सू-शी केली की नाही, याकडे लक्ष द्यावे लागत नाही. कपड्याप्रमाणे वारंवार डायपरला धुवावे लागत नाही. डायवरचे इतके फायदे असूनही, मुलांना डायपर घालताना तुमच्याकडून झालेली एक चूक बाळाच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे जाणून घेऊयात, मुलांना डायपर घालणे सुरक्षित आहे का?

मुलांना डायपर घालणे सुरक्षित आहे का?

लहान मुलांना डायपर योग्य आकाराचे आणि उत्तम क्वालिटीचे डायपर घालू शकता. फक्त काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

कोणते डायपर खरेदी कराल?

  • डायपरचे मटेरियल मऊ आणि फ्लफी असणे आवश्यक आहे. अशा डायपरमुळे बाळाच्या त्वचेला नुकसान पोहोचत नाही.
  • लूज डायपर किंवा जास्त घट्ट डायपर खरेदी करू नये. योग्य आकाराचे डायपर खरेदी करावे.
  • डायपर खरेदी करताना त्यात सूपर्ब अब्जार्ब क्वालिटी आहे का? हे तपासून घ्यावे.

डायपर घातल्याने उद्भवतात या समस्या – 

  • बरेच पालक रात्री झोपेत व्यत्यय येऊ नये म्हणून मुलांना झोपताना डायपर घालतात. असे केल्याने कपडे खराब होण्यापासून वाचतात खरे पण, मुलांच्या आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो.
  • डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलांना 24 तास डायपर घालू नये.
  • मुलांना सतत डायपर घातल्याने त्वचेवर ओलावा राहतो, ज्यामुळे त्वचेचे इन्फेक्शन होऊ शकते.
  • घरात असताना डायपर मुलांना घालू नये. तुम्ही प्रवासासाठी जाणार असाल तर एकवेळ डायपर घालू शकता.
  • डायपरमध्ये सिंथेटिक फायबर रंग, केमिकल्स असतात. या केमिकल्समुळे सेन्सिटिव्ह त्वचेचे नुकसान होऊ शकते.
  • डायपरमुळे युरिनरी इन्फेक्शन होऊ शकते.
  • सतत डायपर घातल्याने त्वचेवर पुरळ उठू शकते.
  • पुरळ त्वचेवर उठल्याने त्वचेची जळजळ होऊ शकते.
  • सतत मुलांना डायपर घातल्याने नैसर्गिकरित्या सू सू करण्याची सवय बिघडू शकते.

 

 

 


हेही पाहा –

Manini