प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र – मैत्रिणी असतातच. मित्रमैत्रिणींमुळे आयुष्य का जगावे याचे उत्तर मिळते. मैत्रीत वय, जातपात, श्रींमत- गरिब असे काहीच पाहिले जात नाही. या मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात एक जवळची मैत्रिण असतेच. अनेक गृहीणींची तर असतेच. जिच्याशी सिक्रेट शेअरींग केले जाते. घरातील सगळी कामे झाल्यावर दुपारच्या वेळी जिच्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या जातात. पण, कधी कधी हीच मैत्रिण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी डोकेदूखी ठरू शकते.
तुमच्या या मैत्रिणीमुळे तुमच्या सुखी वैवाहिक जीवनात विष कालवले जाऊ शकते. त्यामुळे अशा मैत्रिणीपासून जितके दूर राहाल तितके उत्तम राहिल. तुम्ही निर्मळ मनाने तुमचे दु:ख, भावना, आयुष्यातील सुखद घटना शेअर कराल. पण, समोरचा तितक्याच आत्मतियतेने सर्व ऐकेल असे नाही. कारण निष्पाप चेहऱ्यामागे एखादा कपटी चेहरा लपलेला असू शकतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा तीन मैत्रिणी सांगणार आहोत, ज्यापासून तुम्ही दूर राहायला हवे.
स्वार्थी –
स्वार्थी मैत्रीण एखाद्या स्वार्थासाठीच तुमच्याजवळ आलेली असते. अशा मैत्रिणीचा तुमच्या खऱ्या मैत्रिशी काही संबध नसतो. त्यामुळे अशा मैत्रिणीच्या एखाद्या चुकीच्या सल्लामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात कलह निर्माण होऊ शकतो.
कपटी –
काही लोकांचा असाही स्वभाव असतो की, माझ्या आयुष्यात काही योग्य सुरू नाही तर इतरांच्या आयुष्यातही मी काही चांगले होऊ देणार नाही. तुमची जवळची मैत्रिण अशा स्वभावाची असेल तर तिच्यापासून दूर राहा. तुम्ही मैत्रिण म्हणून सांगायला जाल पण नको ते घडेल. तिच्या स्वभावामुळे आणि तिच्या कृतीमुळे तुमचं वैवाहिक जीवन अडचणीत सापडू शकते. अशा स्वभावाच्या व्यक्ती कान भरण्यातही पटाईत असतात. ती तुमचे नवऱ्याविरोधात कान भरू शकते. एखादा संशयाचा किडा तुमच्या नात्यात पेरू शकते.
अहंकारी –
अहंकारी व्यक्तींना केवळ स्वत: चाच विचार असतो. त्यांना समोरच्याच्या भावनांची कदर नसते. त्यामुळे अशा मैत्रिणीपासून दूर राहा. तुम्हाला तिच्या अहंकाराचा सामना करावा लागेल. ती तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबियांना कमी लेखू शकते. परिणामी, तुमच्यावर आणि तुमच्या नात्यावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
Edited By – Chaitali Shinde