Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Relationship तुम्ही निगेटीव्ह लोकांच्या संपर्कात आहात का? असे ओळखा

तुम्ही निगेटीव्ह लोकांच्या संपर्कात आहात का? असे ओळखा

Subscribe

दुसऱ्यांवर उगाचच जळणे, प्रत्येक वेळी चुका काढणे किंवा वाईटच बोलणे अशा काही सवयी असलेल्या व्यक्ती तुमच्या आसपास असतील तर अशा व्यक्तींपासून जेवढं लांब राहता येईल तेवढं रहा. अशा लोकांचा निगेटिव्ह स्वभाव तुमच्या आयुष्यावर ही प्रभाव टाकू शकतो. स्वत:ला शहाणे समजणारी लोक आसपासची स्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा उद्देश हाच असतो की, केवळ लोकांना त्रास देणे. सर्वाधिक विचित्र गोष्ट म्हणजे त्यांच्या या सवयीबद्दल सर्वांनाच माहिती असते. तरीही ते काहीच करत नाही. जर तुमच्या आजूबाजूला सुद्धा अशी लोक असतील तर अशा लोकांपासून लगेच दूर करण्यातच भलाई आहे. (Signs of negative people)

पुढील हे संकेत दाखवतात तुमच्या आजूबाजूला निगेटिव्ह व्यक्ती आहेत.

- Advertisement -

-चुका काढत राहणे
निगेटिव्ह लोक नेहमीच दुसऱ्यांमधील चुका काढत राहतात. त्यांचा अर्धा दिवस यामध्येच निघून जातो. ते रिकाम्या दिवसात दुसऱ्यांना कोसणे आणि त्यांना पॉइंट आउट करण्यामध्येच निघून जातो.

-पोक करण्याची सवय
अशी लोक दुसऱ्या लोकांना खरं-खोटं ऐकण्यासाठी वादाचे कारणच शोधत असता. प्रत्येक गोष्टीवरुन टोमणे मारणे, त्यांच्या चुका वाढवून चढवून सांगणे त्यांना फार आवडते.

- Advertisement -

-दुसऱ्यांवर नजर ठेवणे
निगेटिव्ह लोक प्रत्येक वेळी सातत्याने दुसऱ्यांवर लक्ष ठेवून असतात. ते काय बोलतात हे जाणून घेण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. त्यानंतर त्यामधूनच एक मुद्दा घेऊन त्यावर दुसऱ्यांसमोर चर्चा करतात. (Signs of negative people)

-ओव्हर रिअॅक्ट करणे
जी लोक दुसऱ्यांवर जळतात किंवा ज्यांचे वागणे नकारात्मक असते ती लोक प्रत्येक लहान गोष्टींवर रिअॅक्ट करतात. ग्रुपमधील अन्य लोकांचा अपमान करण्याासठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. अशी लोक विश्वासू नसतात.


हेही वाचा- Relationship…. टॉक्सिक आणि केअरिंग पार्टनरमध्ये असतो ‘हा’ फरक

- Advertisment -

Manini