Thursday, September 28, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health शरीरात होत असतील 'हे' बदल तर व्हा सावध

शरीरात होत असतील ‘हे’ बदल तर व्हा सावध

Subscribe

भूक किंवा तहान लागल्यानंतर आपले शरिर आपल्याला काही सिग्नल देते त्याच प्रमाणे शरिरात कोणत्याही प्रकारचे बदल झाल्यानंतर समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. अंग दुखणे, शरिराचे तापमान अचानक वाढणे किंवा थकवा जाणवे हे कोणते ना कोणते संकेत तुम्हाला देत असतात. न्युट्रिशनच्या कमतरतेमुळे आपले शरिर सुरळीत काम न करणे किंवा कोणत्या प्रकारच्या हेल्थ कंडिशनमुळे आपले शरिर काही ना काही संकेत देते. त्यामुळे ते संकेत वेळीच ओळखणे फार गरजेचे आहे. (Signs of unhealthy body)

जर तुम्हाला ती लक्षणं वेळीच ओळखता आली नाही तर शरिरात समस्या अधिक वाढू शकतात. याबद्दल तज्ञ काय सांगतात हे पाहूयात.

- Advertisement -

-दातांच्या हिरड्यांमधून रक्त येणे
दातांच्या हिरड्यांमधून रक्त येणं नेहमीच अनहेल्दी गम्समुळे होते असे नाही. यामागे विटामिन सी ची कमतरता. हार्मोन असंतुलित होणे, लिवर संबंधित आजार आणि ब्लड डिसऑर्डर सुद्धा असू शकते. जर तुम्हाला गम ब्लीडिंगची समस्या असेल तर याकडे दुर्लक्ष करु नका. यापासून दूर राहण्यासाठी सिट्रिक वेजिटेबल्स आणि फ्रुट्सचा समावेश आपल्या डाएटमध्ये करा.

- Advertisement -

-बर्फ खाण्याची क्रेविंग होणे
लहानपणी आपण फ्रिजमधला बर्फ काढून असचं खायचो. बर्फ खाण्याची क्रेविंग होण्यामागे एक कारण असे ही एनीमिक असणे. जर तुमच्या शरिरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यास तुम्ही बर्फ खाण्याची क्रेविंग खुप होऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये लोह युक्त फूड्सचा समावेश करा. (Signs of unhealthy body)

-त्वचा कोरडी होणे
बदलत्या ऋतूनुसार ड्राय स्किन होण्याची समस्या सामान्य आहे. परंतु अधिक ड्राय स्किनची समस्या होत असेल तर समजा तुमच्या शरिरात न्युट्रिशन्सची कमतरता आहे. बहुतांश वेळा असे होते की, शरिरात विटामिन ई च्या कमतरतेमुळे स्किन ड्राय होऊ लागते. अंडी, पालक, बदाम आणि सुर्यफुलाच्या बिया सारख्या विटामिन ई चा उत्तम स्रोत असलेले फुड्स तुमच्या डाएटमध्ये समावेश करा.

-पाय दुखणे
पाय दुखणे ही सामान्य समस्या असली तरीही त्याकडे लक्ष दिले पाहिजे. जर तुमचे पाय अधिकच दुखत असतील तर यामागे मॅग्नेशियम किंवा विटामिन डी ची कमतरता असू शकते. शरिरात पाण्याच्या कमतरतेमुळे किंवा मसल्समध्ये थकवा निर्माण झाल्यास पाय दुखण्याची समस्या उद्भवू शकते. विटामिन डी आणि मॅग्नेशियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी दूध, दही, मासे, भोपळ्याच्या बिया, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आपल्या डाएटमध्ये करावा.


हेही वाचा- तुमच्या युरिनचा रंग सांगेल तुम्ही दररोज किती पाणी प्यावे

- Advertisment -

Manini