Tuesday, April 23, 2024
घरमानिनीचांदीचे पैजण घातल्याने होतात 'हे' फायदे

चांदीचे पैजण घातल्याने होतात ‘हे’ फायदे

Subscribe

भारतात खुप वर्षांपासून पैजण घालण्यामागे सामाजिक आणि आध्यात्मिक महत्व असल्याचे सांगितले जाते. अशातच तर ते चांदीचे पैजण असतील तर त्यामागे सुद्धा ज्योतिष आणि वैज्ञानिक काही कारणं आहेत.

पैजण घालणे हे महिलांच्या सोहळा श्रृगांरांपैकी एक असल्याचे मानले जाते. पायात पैजण घातल्याने केवळ पायाची शोभाच वाढत नाही तर ते वैवाहिक आयुष्याचे निशाण ही मानले जाते. परंतु सध्याच्या बदल्य॒त्या काळानुसार बहुतांश लोक विविध प्रकारचे अँकलेट घालतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही पायात चांदीचे पैजण घालत असाल तर तुमच्या पायांचे सौंदर्य वाढतेच. पण त्याचसोबतच त्याचे काही फायदे ही होतात.

भारतात खुप वर्षांपासून पैजण घालण्यामागे सामाजिक आणि आध्यात्मिक महत्व असल्याचे सांगितले जाते. अशातच तर ते चांदीचे पैजण असतील तर त्यामागे सुद्धा ज्योतिष आणि वैज्ञानिक काही कारणं आहेत. पैजण घातल्याने व्यक्तीला आपल्याला शरिरात उर्जा प्राप्त करण्यास मदत होते. तर जाणून घेऊयात पायात चांदीचे पैजण घालण्यामागील नक्की काय फायदे होतात त्याबद्दल अधिक.Here is the Scientific Reason for Wearing a silver Anklets!!! | Fashionworldhub

- Advertisement -

पैजणांचा इतिहास प्रथम पाहूयात पैजण वापरण्याची परंपरा ही भारतात प्राचीन काळापासून सुरु झाली. त्यावेळी भरगच्च पैजण घालणे म्हणजे धनाचे प्रतीक मानले जायचे. जर महिलेने भरगच्च पैजण घातले असतील तर ती एका श्रीमंत घराण्यातील ओळखली जायची. परंतु हलके पैजण हे गरिबांचे संकेत द्यायचे. ऐवढेच नव्हे तर हंपीच्या मुर्त्यांमधून असे कळते की, पैजण आपल्या दागिन्यांमधील एक महत्वाचा हिस्सा राहिला आहे. पैजणांना पाटिलु, पायल, गोलुसू आणि काही ठिकाणी नूपुर असे ही म्हटले जाते.

ज्योतिष शास्रानुसार चांदीचे पैजण घालण्यामागील फायदे

- Advertisement -

Designer Anklets That You Can Absolutely Wear at Home! • South India Jewels

-चांदीला चंद्र ग्रहाचा धातु मानला जातो. चंद्र आपल्या मनाशी संबंधित असून आपली मानसिक शक्ती वाढवतो आणि नकारात्मक उर्जा दूर करतो. त्यामुळे चांदीचे पैजण घातल्याने शरिरातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक उर्जा टिकून राहते. खरंतर चंद्र शरिरात उर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतो. असे मानले जाते की, भगवान शंकरांच्या डोळ्यांमधून चांदीची उत्पत्ति झाली होती, ज्यामुळे चांदी हे समृद्धीचे सुद्धा प्रतीक आहे.

– तसेच आपली जेव्हा मानसिक स्थिती उत्तम असते आणि तेव्हा आप कोणत्याही समस्येवर तोडगा काढू शकतो. हिच कारणं आहेत की, ज्योतिष शास्त्रात चांदीचे पैजण घालण्याचा सल्ला दिला जातो.

शरिराला थंडावा देतात चांदीचे पैजण

506 Indian Ankle Bracelets Stock Photos, Pictures & Royalty-Free Images - iStock

पायात पैजण घातले जातात त्याला केतुचे स्थान मानले जाते. जर केतुत शीतलता नसेल तर नेहमीच नकारात्मक विचार आणि क्लेशचे कारण ठरु शकते. त्यामुळे जर तुम्हाला तुमची सहनशक्ती वाढवायची असेल तर पायात चांदीचे पैजण जरुर घाला.

पायांच्या दुखण्यापासून मिळतो दिलासा

Silver Anklet Trendy Indian Oxidized Anklets Feet Bracelet - Etsy

जर पायात दुखणे, सुन्नता किंवा पायांना मुंग्या येणे अशी समस्या येत असेल तर चांदीचे पैजण घालणे फायदेशीर ठरु शकते. पैंजण खासकरुन अशावेळी फायदेशीर ठरतात जेव्हा तुमच्या पायाच्या पाठीमागे खालच्या बाजूस खुप दुखते. जर तुम्हाला सुद्धा असा त्रास होत असेल तर तुम्ही चांदीचे पैजण जरुर घालू शकता. चांदीचे पैजण अशा प्रकारच्या काही समस्यांपासून तुम्हाला दूर ठेवतात.


हेही वाचा-ट्रेडिशनल आऊटफिटवर ‘या’ गोल्डन बांगड्या करा वेअर

- Advertisment -

Manini