Sunday, December 3, 2023
घरमानिनीKitchenRecipe : सफरचंद मालपुवाची सोप्पी रेसिपी

Recipe : सफरचंद मालपुवाची सोप्पी रेसिपी

Subscribe

सध्या दिवाळीचा सण सुरु असून या काळात अनेकजण फराळाचा आस्वाद घेत आहेत. मात्र, तोच तोच फराळ खाऊन कंटाळा आला असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी सफरचंद मालपुवाची रेसिपी घेऊन आलो आहोत.

साहित्य :

 • 4 मध्यम सफरचंद
 • वाटीभर शिंगाडा पीठ
 • अर्धा चमचा दालचिनी पूड
 • 300 ग्रॅम साखर
 • तळण्याकरता रिफाईंड तेल
 • पिस्ता, बदाम काप
 • तयार रबडी

कृती :

इंस्टेंट एप्पल मालपुआ (instant apple malpua recipe in Hindi) रेसिपी बनाने की विधि in Hindi by Seema Kejriwal - Cookpad

 • सर्वप्रथम साल काढून सफरचंदाच्या गोल जाड चकत्या कराव्यात.
 • शिंगाड्याच्या पिठात दालचिनी पूड घालावी.
 • पाणी घालून भिजवावे आणि पॅनमध्ये तेल तापवावे.
 • सफरचंदाचे स्लाईस शिंगाड्याच्या पिठात बुडवून गुलाबी होईपर्यंत तळावे.
 • दुसर्‍या कढईत साखरेत 300 ग्रॅम पाणी घालून पाक करावा.
 • तळलेले स्लाईस गरम पाकात टाकावेत. निथळून डिशमध्ये मांडावेत.
 • थंड झाल्यावर त्यावर थोडी थंड रबडी घालावी. बदाम, पिस्त्याचे काप टाकावेत.
 • थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवून थंड करून खायला घ्यावे.
 • हा टेस्टी मालपुवा गरमही खाऊ शकता.

हेही वाचा :  Recipe : चविष्ट दुधी हलवा 

- Advertisment -

Manini