आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे तणाव आणि अँक्झायटीचे प्रमाण खूप वाढत चाले आहे. सततची चिंता, घाबरण्याची भावना आणि अस्वस्थता यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आजकाल बऱ्याच लोकांना अँक्झायटी होते. अँक्झायटीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाले आहे. आज आपण जाणून घेऊयात अँक्झायटी दूर कशी करायची.
अँक्झायटीची कारणे
- जॉब, बिझनेस किंवा करिअरमधील अनिश्चितता
- नातेसंबंध, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी.
- इतरांशी स्वतःची तुलना केल्याने कमीपणाची भावना निर्माण होऊ शकते.
- जास्त प्रमाणात कॅफीन, जंक फूड आणि व्यायामाचा अभाव.
अँक्झायटी दूर करण्यासाठी सोपे उपाय
एरोबिक व्यायाम
आरोग्य तज्ञाच्या मते जेव्हा तुम्हाला अँक्झायटी वाटत असेल तेव्हा शरीराची हालचाल करणे अत्यंत गरजेचं आहे. अशावेळी तुम्ही एरोबिक व्यायाम करू शकता. या व्यायामामुळे शरीराची हालचाल देखील होईल. एरोबिक व्यायामांमध्ये वेगाने चालणे, धावणे, सायकलिंग, पोहणे आणि नृत्य यांचा समावेश करू शकता.
मेडिटेशन आणि योगा
मेडिटेशन आणि योगा केल्याने आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. अँक्झायटी कमी होण्यास मदत होते.
स्वत:ला व्यस्त ठेवा
तुम्ही स्वत:ला व्यस्त ठेवा. जेणेकरून तुम्हाला भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा त्रास होणार नाही.
जवळच्या व्यक्तींशी संवाद साधा
अँक्झायटी होण्यामागच सर्वात मोठं कारण म्हणजे आपण कोणाशी भावना व्यक्त करत नाही. कोणाला सांगत नाही त्यामुळे अँक्झायटी खूप वाढते. अशावेळी तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधा. तुमचं मन हलकं करा.
श्वास घ्या
श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने आराम मिळतो आणि चिंता कमी होते.
विश्रांती घ्या
पुरेशी झोप होत नसेल तर याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर देखील होतो. तणावामुळे रोज नीट झोप येत नसेल तर याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर देखील होतो. त्यामुळे तणाव दूर करण्यासाठी चांगली झोप घेणे अत्यंत गरजेचं आहे.
अशाप्रकारे तुम्ही अँक्झायटी दूर करू शकता.
हेही वाचा : Parenting Tips : मुलांवर सतत चिडण्याऐवजी असे बना कूल पेरेंटस्
Edited By : Prachi Manjrekar