गारवा देणारा पाऊस अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच सुखद वाटतो. पण पावसाळ्यात आपल्या दैनंदिन सवयीत लहानसहान बदल करणे, आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. काही कालावधीनंतर आपलं शरीर खूप कमकुवत होत जाते. शरीराची परिस्थिती खूप नाजूक होत जाते. अगदी हेच वृद्धांसोबत होत. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक प्रकृतीकडे खूप लक्ष द्यावं लागतं. या दिवसात अनेक आजार वेगाने पसरतात.
पावसाळ्यात ताप, सर्दी, खोकला, निमोनिया, मलेरिया या समस्या वृद्धांमध्ये अधिक आढळतात. वयोमामानानुसार आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे वृद्ध व्यक्ती आजारपणाला लवकर बळी पडतात. त्यामुळे उपचारापेक्षा खरबदारी घेणे केव्हाही योग्यच. त्यामुळे पुढील समस्या आपण टाळू शकतो. त्यामुळे पावसाळ्यात वृद्धांची नेमकी कशी काळजी घ्याल, यासाठी काही खास टिप्स
- आपल्या आजी आजोबांना वेळोवेळी हेल्थ चेकअपसाठी घेऊन जा . या दिवसात विशेष घेऊन जा कारण या दिवसात अनेक आजार वेगाने पसरतात त्यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना आजार लगेच होतात.
- वृद्धांनी नेहमी पाणी उकळून प्यावे. हे त्यांच्या शारीरिक प्रकृतीसाठी देखील चांगलं आहे. तसेच वृद्धांनी नियमितपणे व्यायाम करावा. बाहेर पाऊस असेल तर घरीच व्यायाम करावा.
- काही काम नसेल तर या दिवसात बाहेर जाणे टाळा. या दिवसात संसर्गजन्य रोग पसरतात. त्यामुळे काम नसेल बाहेर जाणं टाळा.
- वृद्धांनी बाहेरच उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नये किंवा मसालेदार पदार्थ सेवन करू नये याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो.
- वृद्ध व्यक्तींना पौष्टिक व सकस आहार द्यावा. चांगले आरोग्य राखण्यासाठी, त्यांना व्हिटॅमिन डी समृद्ध आहार द्यावा. तसेच वृद्धांनी थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसावे.
- वृद्ध व्यक्तींशी नियमितपणे बोलत रहा, संवाद ठेवा. यामुळे ते येणारे नैराश्य अथवा डिप्रेशनपासून वाचू शकतील.
- विशेष म्हणजे वृद्धांना ताणमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण ताण-तणावांमुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या उद्धवू शकतात. तसंच त्याचा परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवरही होतो.
Edited By : Nikita Shinde