Sunday, February 25, 2024
घरमानिनीHealthफ्रिजचा वापर न करता टोमॅटो अधिक काळ टिकवण्यासाठी सोप्या ट्रिक्स

फ्रिजचा वापर न करता टोमॅटो अधिक काळ टिकवण्यासाठी सोप्या ट्रिक्स

Subscribe

प्रत्येक घरात रोजच्या जेवणात किंवा सॅलेडमध्ये टोमॅटो सर्रास वापरला जातो. टोमॅटो खाणं शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु अनेकदा बाहेरील वातावरणामुळे टोमॅटो लवकर खराब होतात. अशावेळी फ्रिजमध्ये न ठेवताही टोमॅटो जास्त वेळ टिकवून ठेवता येतात. टोमॅटो अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स नक्कीच तुमच्या उपयोगी पडतील.

टोमॅटो टिकवण्यासाठी ट्रिक्स

Ask the Master Gardener: Are tomatoes vegetables, fruits or both? -  Brainerd Dispatch | News, weather, sports from Brainerd and Baxter

- Advertisement -

 

 

- Advertisement -
  • टोमॅटो उघड्या भांड्यात ठेवा

एखाद्या उघड्या कंटेनरमध्ये झाकण न लावता तुम्ही टोमॅटो ठेऊ शकता. यामुळे टोमॅटोला मोकळा वारा मिळेल. टोमॅटो कंटेनरमध्ये ठेवताना ते स्वच्छ धुवून कोरडे करून मगच ठेवावे. तसेच कंटेनर वेळोवेळी सूर्यप्रकाशाच्या संपर्कात ठेवा. त्यामुळे कंटेनरमध्ये टोमॅटो अधिक काळ टिकून राहतील.

  • मातीचा वापर करा

टोमॅटो जास्त दिवस टिकावे यासाठी मातीचाही वापर केला जातो टोमॅटो ठेवण्याचे भांडे स्वच्छ धुवून करून कोरडे करून घ्यावे. त्यानंतर त्यात माती भरावी आणि त्यात टोमॅटो पूर्ण झाकले जातील असे ठेवावे. टोमॅटो मातीत ठेवताना पूर्ण कोरडे असले पाहिजेत. त्यामुळे फ्रिजचा वापर न करता टोमॅटो अधिक काळ टिकू शकतात त्याच बरोबर मातीतील नैसर्गिक तत्वं सुद्धा त्यात उतरतील.

  • प्लास्टिक कंटेनरचा वापर

अनेकदा टोमॅटो स्वयंपाकघरात ठेवतात. स्वयंपाकघरातील उष्णतेमुळे टोमॅटो लवकर खराब होतात. त्यामुळे टोमॅटो अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही प्लास्टिकच्या कंटेनरचा वापर करता येऊ शकता. यासाठी टोमॅटो चांगले कोरडे करून घ्या आणि हवा खेळती राहील अशा प्लास्टिकच्या डब्यात भरून घरातील गारवा असलेल्या ठिकाणी ठेवा. यामुळे टोमॅटो लवकर खराब होणार नाहीत.


हेही वाचा :

Nachni Biscuit : पौष्टिक नाचणी बिस्कीट

- Advertisment -

Manini