काही परिवार असे असतात की, जेथे केवल एकच मुलं असते. अशातच सिंगल चाइल्डसाठी रक्षाबंधन तुम्ही विविध प्रकारे साजरी करू शकता. कोणत्या अशा ट्रिक्स आहेत ज्या यंदाच्या रक्षाबंधनाला तुम्ही वापरु शकता याच बद्दल आम्ही सांगणार आहोत.
-रक्षाबंधनासाठी मुलासोबत फिरायला जा
तुम्ही तुमच्या आवडीच्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता. त्यामुळे मुलाला एकटे वाटणार नाही. या व्यतिरिक्त तुम्ही मुलांसोबत आवडीचा सिनेमा पाहू शकता. त्याचसोबत त्याच्यासोबत क्वालिटी टाइम घालवू शकता.
-झाडांसोबत सेलिब्रेट करा रक्षाबंधन
सिंगल चाइल्डला तुम्ही झाडावला राखी बांधून सेलिब्रेट करण्यास सांगू शकता. यामुळे त्याला निसर्गाशी जोडले राहण्यास मदत होईल. या व्यतिरिक्त रक्षाबंधनाच्या दिवशी पाळीव प्राण्याला गिफ्ट देऊ शकता.
-आजी-आजोबांसोबत सेलिब्रेट करु शकता रक्षाबंधन
जर तुम्ही तुमच्या सासू-सासऱ्यांसोबत राहत असाल तर रक्षाबंधन साजरा करण्यासाठी तुम्ही आजी-आजोबांच्या घरी घेऊन जाऊ शकता. अथवा मित्राच्या घरी सुद्धा जाऊ शकता. यामुळे त्याचा ऐकटेपणा दूर होईल.
हेही वाचा- 4 ऑगस्ट कशासाठी साजरा करायचा?