घरलाईफस्टाईलपोह्यांचं स्क्रब वापरा, सुंदर दिसा

पोह्यांचं स्क्रब वापरा, सुंदर दिसा

Subscribe

पोहे हा सर्वांच्या घरांमध्ये होणारा एक ठराविक पदार्थ आहे. बनवायला सोपा आणि झटपट होणारा पदार्थ म्हणजे पोहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांचा पोहे हा आवडीचा पदार्थ आहे. पोहे हा पदार्थ प्रत्येकाच्या घरी सहज उपलब्ध असणारा पदार्थ आहे. चहा आणि पोहे हे एक भन्नाट समीकरण संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. पण पोहे फक्त खाण्यासाठीच उपयोगी आहेत का तर नाही पोहे आपल्या त्वचेसाठीही उपयुक्त आहे. आपण आपला चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी स्क्रबचा वापर करतो. स्क्रबमुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकण्यास मोठी मदत होते. बाजारात अनेक महागडे स्क्रब्स उपलब्ध आहेत. त्वचेसाठी नैसर्गिक स्क्रब वापरणे कधीही योग्य. घरात कायम उपलब्ध असणाऱ्या पोह्यांपासूनही आपण स्क्रब तयार करु शकतो. जाणून घ्या पोह्यांपाहून घरगुती स्क्रब तयार करून सुंदर कसे दिसता येईल.

पोह्यांचे स्क्रब तयार करण्यासाठी साहित्य

घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून पोह्यांचे उपयोगी स्क्रब तयार करता येते. पोह्यांचे हे स्क्रब १५ ते २० दिवस आरामात वापरू शकता. पोह्यांचे स्क्रब तयार करण्यासाठी १ कप पोहे, १ कप तांदूळ, १ कप चण्याची टाळ आणि १ कप नाचणी हे साहित्य लागते.

- Advertisement -

असे तयार करा पोह्यांचे स्क्रब

पोह्यांचे स्क्रब तयार करण्यासाठी पोहे, तांदूळ,चण्याची डाळ आणि नाचणी हे सर्व एकत्र करुन घ्या. सर्व पदार्थ एकत्र करुन ते मिक्सरमधून दाणेदार वाटून घ्या. ही वाटलेली पावडर तुम्ही महिनाभर वापरु शकता. ही तयार केलेली पावडर एका हवा बंद ठेवा. तयार केलेली स्क्रबची पावडर तुम्ही गरज असेल तेव्हा दही, गुलाबपाणी, एलोवेरा जेल किंवा दूधात मिक्स करुन तुम्ही चेहऱ्याला लावू शकता.

त्वचेला होतील हे फायदे

स्क्रब चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाण्यास मोठी मदत होते. चेहरा जर ऑयली असेल तर गुलाबपाणी, किंवा एलोवेरा जेलमध्ये मिक्स करुन तुम्ही स्क्रब करु शकता. या स्क्रबचा वापर फक्त चेहऱ्यासाठीच नाही तर संपूर्ण बॉडीसाठी ही करु शकता. ३ ते ४ मिनीटे केल्याने त्वचेला खूप फायदे होतील.

- Advertisement -

चण्याच्या डाळीत क्लिंजिंगचे गुण असतात. त्वचेचा हलकासा रंग बदलण्यासाठी त्वचा चमकण्यासाठी चण्याची डाळ किंवा बेसन मोठी मदत करते. तांदूळात असलेल्या स्टार्चमुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाण्यास मोठी मदत होते. नाचणीमध्ये असलेले अमिनो एसिड त्वचेचा सैलपणा कमी करण्यास मदत करते. पोह्यांमध्ये असलेल्या आयरनमुळे त्वचा खोलवर साफ होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे त्वचेतील तेलकटपणाही कमी होतो.


हेही वाचा – व्हॅक्सिंग केल्यावर तुमच्या त्वचेवरही येतो पुरळ? मग ‘हे’ करा उपाय

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -