Friday, February 23, 2024
घरमानिनीBeautyपार्टीनंतर स्किनची अशी घ्या काळजी

पार्टीनंतर स्किनची अशी घ्या काळजी

Subscribe

पार्टीपूर्वी आपण आपल्या स्किनची केअर करतो. ऐवढेच नव्हे तर पार्टी दरम्यान स्किन ग्लो होण्यासाठी विविध क्रिम्सची मदत घेतो. त्यानंतरच त्यावर मेकअप लावतो. स्किनची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. पार्टीसाठी हैवी मेकअप केला जातो. पण याचा कुठे ना कुठे नकारात्मक परिणाम स्किनवर होतो. त्यामुळे पार्टीनंतर स्किनची कशी काळजी घ्यायची हे जाणून घेऊयात.

पार्टीनंतर तुम्हाला स्किन केअर करायची असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणडे आपला मेकअप व्यवस्थितीत काढा. ऐवढेच नव्हे तर स्किनला दुसऱ्या दिवशी सुद्धा मेकअप अप्लाय करू नका. यामुळे स्किनला रिजुविनेट होण्यास मदत मिळते.

- Advertisement -

Why you don't need to use a bunch of skin care products.

त्याचसोबत स्किनला पॅम्पर करण्यासाठी सुरुवात नेहमीच बेसिक्सपासून करा. यासाठी सीटीएम रुटीन फॉलो करा. खरंतर सर्वात प्रथम आपल्या स्किनला क्लिन करा. त्यानंतर त्याची टोनिंग आणि मॉइश्चराइज करा. ही बेसिक स्टेप्स तुमच्या स्किनला हेल्दी बनवण्यास मदत होईल.

- Advertisement -

जर तुम्हाला वाटत असेल सातत्याने पार्टीच्या कारणास्तव स्किन थकली असेल, ड्राय झाली असेल तर तुम्ही शीट मास्कचा वापर करा. हे शीट मास्क तुमची स्किनला अतिरिक्त हाइड्रेशन देईल. त्यामुळे तुमची स्किन नॅच्युरली स्मूथ आणि ग्लोइंग दिसेल.

तसेच लेट नाइट पार्टीच्या कारणास्तव डोळयांखाली डार्क सर्कल्स, सूज येणे अशा समस्या उद्भवू शकतात. अशातच स्किन केअर करण्यासाठी आय क्रिम अप्लाय करा. डोळ्यांखाली एरियाला हाइड्रेट करण्यासाठी कॅफेन किंवा हाइलूरोनिक अॅसिडचा वापर करण्यात आलेले प्रोडक्ट्स वापरू शकता.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे पार्टीनंतर जेव्हा स्किन केअरबद्दल बोलतो. तेव्हा आपण त्याकडे लक्ष देत नाही की, स्किनच्या रिकव्हरीसाठी पुरेशी झोप घेणे अत्यंत गरजेचे आहे. पार्टीनंतर रात्री पुरेशी झोप घ्यावी. झोपेव्यतिरिक्त आपल्या डाएटकडेही लक्ष द्यावे. जेव्हा तुम्ही बलेन्स डाएट खाता तेव्हा स्किनच्या रिकव्हरीसाठी मदत मिळेल.


हेही वाचा- Diwali 2023: फेस्टिव्ह ग्लोसाठी ‘या’ खास ब्युटी टिप्स

- Advertisment -

Manini