त्वचा कोरडी पडणे, फाटलेले ओठ आणि हात-पायांची त्वचा कोरडी पडणे यामुळे लोक त्रस्त असतात. हे टाळण्यासाठी सुका मेवा नक्की खा. सुकामेवा विशेषतः बदाम, अक्रोड आणि मनुका आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने त्वचा आणि केस चांगले राहतात. रोज नट खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो आणि अनेक आजारही दूर होतात. ड्रायफ्रूट्समध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात.
मनुका
मनुक्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. मनुक्याच्या सेवनाने आपली त्वचा हायड्रेट होते काळे मनुके त्वचेला डिटॉक्सिफाई करून त्वचा आणखी चमकदार बनवतात. निरोगी त्वचेसाठी तुम्ही भिजवलेले मनुके खाऊ शकतात.
अंजीर
अंजीर त्वचेच्या विकारांमध्ये उत्तम कार्य करते. पायांना जळवातांच्या भेगा पडल्या असतील तर कच्च्या अंजीराचा चीक लावल्यास लवकर भरून येतात.
बदाम
बदाममध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट असतात जे सूर्याच्या किरणांपासून त्वचेचे रक्षण करतात. हे त्वचा मऊ आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे सकाळी लवकर भिजवलेले बदाम खाल्ल्याने त्वचा चमकदार होते.
काजू
काजूमध्ये लोह, फॉस्फरस, जस्त, तांबे, व्हिटॅमिन सी आणि सेलेनियम भरपूर प्रमाणात असते. हे कोलेजन पातळी सुधारण्यास मदत करतात. हे प्रोटीन त्वचेला तरुण ठेवते आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.
अक्रोड
अक्रोडमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे असतात. त्यात व्हिटामिन बीची सर्वाधिक मात्रा आहे, जी चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि गडद डाग कमी करण्यास मदत करते. अक्रोड हा एक्सफोलीएट एजंट आहे, जो मृत त्वचेचे आवरण काढून टाकण्याचे काम करते.
खजूर
खजूरमध्ये जीवनसत्त्व अ आणि ब असते. हे त्वचेची लवचिकता सुधारतात आणि हे कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर मानले जातात. विशेषत: सुरकुत्या दूर करण्यासाठी खजूर उपयुक्त ठरू शकतात.
हेही वाचा : Fashion Tips : फ्रॉक स्टाइल सलवार सूटच्या नवीन डिझाइन्स