Thursday, March 27, 2025
HomeमानिनीSkin Care : बदलत्या ऋतुनुसार घ्या त्वचेची काळजी

Skin Care : बदलत्या ऋतुनुसार घ्या त्वचेची काळजी

Subscribe

प्रत्येकाला सुंदर दिसायचे असते. सुंदर, चमकदार त्वचेसाठी विविध प्रकारे त्वचेची काळजी घेण्यात येते. पण, बदलत्या हवामानाचा आरोग्यासह त्वचेवर खोलवर परिणाम होतो. त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. यासाठी उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. कारण या दिवसात त्वचा काळवंडणे, घामोळा, खाज येणे अशा तक्रारी जाणवतात. अशा परिस्थितीत बदलत्या ऋतुनुसार सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यत त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. दुपारी जेव्हा तीव्र उन्हातून बाहेर निघता तेव्हा सनबर्न होऊ नये, यासाठी तर काळजी घ्यायलाच हवी. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात बदलत्या ऋतुनुसार त्वचेची काळजी कशी काळजी घ्यावी,

  1. त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी शरीरातील पाण्याची पातळी महत्त्वाची भूमिका बजावते. उन्हाळ्यात शरीराला पाण्याची गरज दीड पटीने वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. तुम्ही रसाळ फळे आणि शीतपेये सुद्धा पिऊ शकता.
  2. कडक उन्हात बाहेर जाण्यापूर्वी टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. विशेष करून तुम्ही जर दुपारच्या वेळेत बाहेर निघणार असाल तर गॉगल, टोपी किंवा छत्री अवश्य वापरा.
  3. उन्हाळ्यात त्वचा काळवंडवू नये यासाठी सनस्क्रीन तुम्ही लावू शकता. यासाठी घराबाहेर पडल्यानंतर 30 पेक्षा जास्त एसपीएफ असलेले सनस्क्रीन दर दोन तासांनी लावणे आवश्यक असते.
  4. उन्हाळ्यात सनस्क्रीनप्रमाणे मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे. काहींचा असा समज असतो की, थंडीच्या दिवसातच केवळ मॉइश्चरायझर लावावे, पण हे चुकीचे आहे. मॉइश्चरायझरमुळे त्वचेची छिद्र बुजतात, ज्यामुळे त्वचा काळवंडण्याची समस्या रोखते.
  5. उन्हाळ्यात भरपूर मेकअप करणे टाळा. मिनरल बेस्ड मेकअप तुम्ही करायला हवा.
  6. सर्वात महत्त्वाचे म्हणजे झोपताना मेकअप उतरवणे आवश्यक आहे. यामुळे उन्हाळ्यात कोणत्याही प्रकारचा संसर्ग होणार नाही.
  7. उन्हाळ्यात आपला आहार सात्विक असणे आवश्यक आहे. कारण तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीचा आरोग्यासह त्वचेवर खोलवर परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही या दिवसात पालेभाज्या, फळे, कमी तेलात तयार केलेले सॅलेड यासारखे पदार्थ खायला हवेत.

 

 

 

 

हेही पाहा –

Manini