Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीSkin Care Tips : निरोगी त्वचेसाठी लावा या सवयी

Skin Care Tips : निरोगी त्वचेसाठी लावा या सवयी

Subscribe

आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते. यासाठी विविध उपाय केले जातात. बाजारातील महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. पण, हवा तसा परिणाम मिळत नाही. कधी कधी तर नॅचरल पद्धतींचा वापर करूनही त्वचेचे सौंदर्य राखता येत नाही. अशा वेळी तुम्ही तुमच्या रोजच्या सवयींकडे लक्ष द्यायला हवे. कारण आपल्या रोजच्या काही चुकिच्या सवयी महागात पडू शकतात. या सवयींचा केवळ शरीरावर नाही तर त्वचेवर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे जाणून घेऊयात, निरोगी त्वचेसाठी कोणत्या सवयी अंगिकारायला हव्यात.

स्किन हायड्रेशन –

आपले शरीर 70 % पाण्याने व्यापले आहे. पाणी शरीरासाठी किती महत्त्वाचे आहे, हे आपणा सर्वानाच माहित आहे. याचप्रमाणे निरोगी त्वचेसाठी पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे असते. पाणी प्यायल्याने त्वचा तजेलदार होते. त्यामुळे त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे.

आहार –

शरीराला पोषण मिळाल्यावर त्वचा निरोगी राहते, हे आपण लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे आहारात व्हिटॅमिन्स, आयर्न, प्रोटीन्स आदी पोषक घटक असणारे पदार्थाचा समावेश करावा. जसे की, अंडी, पालेभाज्या, डाळी, सुकामेवा.

झोप –

झोप शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची असते. अपूर्ण झोपेमुळे विविध आजार होण्याची शक्यता असते, त्याचप्रमाणे त्वचेवरही परिणाम दिसून येतो. पूर्ण झोपेमुळे त्वचा तरुण दिसण्यास मदत होते. त्यामुळे पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.

व्यायाम –

व्यायाम केल्याने शरीर तंदूरुस्त राहते. तसेच शरीरात रक्त पुरवठा सुरळीत होतो, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते. परिणामी, तुमच्या त्वचेचे सौंदर्य अबाधित राहते. त्यामुळे आपण कितीही व्यस्त असलो तरी आपण थोडा वेळ दररोज व्यायाम करायला हवा.

ताणाला ठेवा दूर –

ताणतणावापासून आपण जितके दूर राहतो, तितके शरीरासाठी फायद्याचे असते. पण, हल्ली धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला कोणकोणत्या गोष्टीचे टेंशन, ताण आहेच. ज्याचा परिणाम केवळ शारीरिक, मानसिक आरोग्यावर नाही तर त्वचेवरही होत आहे. त्यामुळे ताणावर नियंत्रण मिळवायला हवे. यासाठी तुम्ही योगा, ध्यान करू शकता.

त्वचेचे क्लिझिंग –

निरोगी त्वचेसाठी तुम्ही क्लिझिंग करणे आवश्यक आहे. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून मगच झोपावे. मेकअप तसाच ठेवून झोपू नये. पाण्याव्यतिरीक्त तुम्ही नॅचरल क्लिझिंगचा वापर करू शकता.

मॉइश्चरायझर –

निरोगी त्वचेसाठी क्लिझिंगप्रमाणे मॉइश्चरायझरचा वापर करणे आवश्यक असते. दररोज मॉइश्चरायझर वापरल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाही आणि त्वचा मऊ राहते.

 

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

Manini