घरताज्या घडामोडीSkin Care Tips : हिवाळ्यात कच्चे दूध वापरा अन् मिळवा तजेलदार चेहरा

Skin Care Tips : हिवाळ्यात कच्चे दूध वापरा अन् मिळवा तजेलदार चेहरा

Subscribe

हिवाळ्यात अनेक त्वचेच्या समस्या उद्भवतात.जास्त थंडीमुळे हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. त्यामुळे हिवाळ्यात अनेकजण आपल्या खाण्यापिण्याप्रमाणेच त्वचेची काळजी घेणारे अनेक उत्पादन वापरण्यास सुरुवात करतात,मात्र त्याचाही फारसा परिणाम पाहायला मिळत नाही.यावर उपाय म्हणून घरच्या घरी चेहरा तजेलदार दिसण्यासाठी कच्च्या दुधाचा उपयोग तुम्ही करु शकता. कच्च्या दूधामध्ये पोटॅशिअम,मॅग्नेशिअम,सेलेनियम आणि लॅक्टिक अ्ॅसिड,प्रोटीन,कॅल्शिअम,व्हिटॅमिन असे अनेक गुण आहेत. हे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. कच्चे दूध हे थंडीमध्ये त्वचेला ग्लोइंग आणि तजेलदार करण्यास मदत करते.कच्चे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा काढून टाकण्यास मदत करतात. जाणून घ्या कच्च्या दुधाचे फायदे.

कच्चे दूध हे उत्तम मॉइश्चरायझर 

सर्वांत गुणकारी मॉइश्चरायझर म्हणून कच्च्या दूधाला मानले जाते. कच्च्या दूधाचा मॉइश्चरायझर म्हणून वापर करण्यासाठी प्रथम ३ ते ४ चमचे कच्चे दूध घ्या.त्यात अर्धा चमचा ग्लिसरीन उत्तमरित्या मिसळून ते कॉटन बॉलच्या साहाय्याने चेहरा,मान आणि ओठांवर लावा.त्यानंतर २० मिनिटांनी चेहरा हा स्वच्छ पाण्याने धुऊन टाका.

- Advertisement -

कच्च्या दूधाचे फेस मास्क

कच्च्या दूधापासून फेस मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम ३ टेबलस्पून कच्चे दूध घ्या.त्यात चिमूटभर मुलतानी माती मिसळा आणि चेहरा आणि मानेला लावा.कमीतकमी २० मिनिटे लावून चेहरा पाण्याने धुवून टाका.

स्क्रबर म्हणून कच्चे दूध फायदेशीर

३ चमचे कच्चे दूध घ्या आणि त्यात १ चमचे साखर मिसळा. यानंतर त्यात एक चमचा बेसन घाला. हे सर्व मिसळा आणि पेस्ट तयार करा. ते तुमच्या त्वचेवर हलक्या हातांनी लावा आणि चेहरा ३ मिनिटे स्क्रब करा. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा.

- Advertisement -

 हे ही वाचा – Fatty Liver | कढीपत्ता ठरतोय ‘फॅटी लिव्हर’वर गुणकारी ; जाणून घ्या फायदे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -