प्रत्येकालाच वाटते आपण सुंदर दिसावे. म्हणून विविध ब्युटी ट्रिटमेंट केल्या जातात. मार्केटमध्ये सुद्धा विविध प्रकारचे स्किन केअर प्रोडक्ट्स मिळतात. काही लोक नैसर्गिक उपायांनी स्किन तजेलदार बनवण्याचा प्रयत्न करतात. मात्र तुम्हाला तुमची त्वचा तजेलदार करायची असेल तर महागडे प्रोडक्ट्स वापरण्याऐवजी नैसर्गिक उपायांचा वापर करु शकता. त्यापैकीच एक म्हणजे स्लॅप थेरपी. स्लॅप थेरपीमुळे खरंच तुमचे सौंदर्य वाढले जाते का? याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात. (slap therapy)
स्लॅप थेरपी नक्की काय आहे?
स्लॅप थेरपी म्हणजे चेहऱ्यावर चापटी मारणे. या थेरपीत चेहऱ्यावर तुम्हाला चापटी मारली जाते. यामुळे चेहऱ्यावर ब्लड सर्कुलेशन उत्तम होते. त्याचसोबत स्किन संबंधित काही समस्या दूर होतात.
स्लॅप थेरपीचे फायदे
-स्लॅप थेरपीमुळे तुमची स्किन सॉफ्ट होते. जर तुम्हाला सॉफ्ट स्किन हवी असेल तर या थेरपीची मदत घेऊ शकता.
-या थेरपीच्या मदतीने स्किनवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे स्लॅप थेरपी फाइन लाइन्सची समस्या दूर करते.
-चेहऱ्यावरील स्नायू अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी स्लॅप थेरपीची मदत घेऊ शकता.
-स्किनची चमक वाढवण्यासाठी सुद्धा स्लॅप थेरपी कामी येईल
-स्लॅप थेरपीमुळे पिंपल्स आणि एक्नेची समस्या दूर होऊ शकते
हेही वाचा- फंक्शनला जाण्यापूर्वी आणि नंतर अशी घ्या त्वचेची काळजी