घरCORONA UPDATEलॉकडाऊन- सतत खाणे आणि झोपणे ठरू शकते घातक

लॉकडाऊन- सतत खाणे आणि झोपणे ठरू शकते घातक

Subscribe

कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे सगळ्यांनाच घरात सक्तीने बसावे लागत आहे. पण हा रिकामा वेळ घालवायचा कसा हा प्रश्न सगळ्यांनाच सतावतोय. यामुळे प्रत्येकजण आपआपल्या परिने स्वत:ला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काहीजणांनी वेळ जात नसल्याने खाण्यापिण्याबरोबरच झोपण्यालाच प्राधान्य दिले आहे. भूक नसतानाही आबरट चाबरट खाणे. नंतर झोपणे. परत उठणे . काहीतरी खाणे. नंतर पुन्हा अंथरुणात लोळणे. असे प्रकार अनेकजण करत आहेत. जे शरीरासाठी घातक असून याचा परिणाम व्यक्तीच्या मानसिकतेवरही होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

२४ तास घरात विमाकाम बसणे तसे सोपे नाही. त्यात सध्या बाहेर कोरोनाची दहशत असल्याने त्याचा नकारात्मक परिणाम प्रत्येकाच्या मनावर होत असल्याचे समोर येत आहे. पण हीच अवस्था वाढल्यास व्यक्तीला हायपर्सोमनिया हा विकार जडू शकतो अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

यामुळे जर सध्याच्या कोरोना आणि ल़ॉकडाऊनचा तणाव घालवण्यासाठी तुम्ही जर भूक नसतानाही मिळेल ते खात असाल. झोपत असाल. तर वेळीच सावध व्हा. कारण ही अवस्था कायमची नसून तात्पुरती आहे. यास आत्मविश्वासाने सामोरे जायचे आहे. यामुळे सकारात्मक विचार करण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.  तसेच काहीजणांच्या बाबतीत मात्र विरोधाभासही आढळत आहे. यात मानसिक तणावामुळे काहीजणांची भूकेबरोबरच झोपही उडाली आहे. यामुळे अपूर्ण झोपेमुळे काहीजणांना डोकेदुखीचा त्रास सुरू झाला आहे. तसेच जेवणाची इच्छाच होत नसल्याने साहजिकच काहींच्या शरीरात व्हिटामिन्सची कमतरता निर्माण झाली आहे. यामुळे कोरोनाबरोबर लढण्यासाठी आवश्यक रोगप्रतिकारकशक्ती लोकांमध्ये कमी होत आहे. ही चिंतेची बाब असल्याचे मत वॉशिंग्टन येथील डॉक्टर जॉन केवर्डस यांनी व्यक्त केली आहे.

हे सर्व टाळायचे असल्यास लॉकडाऊनच्या काळातही रोजच्या कामांचे वेळापत्रक बनवा.

- Advertisement -

उठण्याची, झोपण्याची, जेवणाची, नाश्त्याची व टाईमपास करण्याच्या  वेळा ठरवा.

सकाळचा नाश्ताच जेवणासारखा करा. त्यामुळे तुम्हांला सतत खाण्याची गरज राहणार नाही.

पाणी भरपूर प्या.

दिवसातून एकदा घरातच व्यायाम , योगा करा.

दिवसातून १० मिनिटे मेडिटेशन करा.

जेवणात संतुलित आहार घ्या.

फास्ट फूड खाणे टाळा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -