घरताज्या घडामोडीतुम्हाला ही रात्रीची झोप येत नाही? ही असू शकतात कारणं

तुम्हाला ही रात्रीची झोप येत नाही? ही असू शकतात कारणं

Subscribe

तुम्हाला ही रात्रीची झोप येत नाही? जाणून घ्या ही आहेत कारणे

खूप लोकांना झोप न येण्याचा त्रास असतो. तसेच कितीही प्रयत्न केले तरी देखील झोप येत नाही. विशेष म्हणजे दिवसभर काम करुन देखील जर तुम्हाला झोप येत नसेल तर त्याचे कारण म्हणजे पौष्टीक आहाराची कमी असल्याने हे होऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या आहारात मिनरल आणि विटामिन्सचा समावेश केल्यास तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता.

पौष्टीक आहार नसल्यास

- Advertisement -

पौष्टीक आहार मिळत नसेल तर त्या व्यक्तीचा झोपेवर परिणाम होतो. एका अभ्यासात असे समजले आहे की, पुरुषांपेक्षा महिलांना रात्रीची झोप येत नाही. कारण पुरूषापेक्षा स्त्रियांमध्ये झोप न येण्याचे मुख्य कारण पौष्टीक आहार नसणे.

अति विचार करणे

- Advertisement -

बऱ्याचदा एखाद्या गोष्टीचा आपण सातत्याने विचार करत राहिल्यास त्याचा परिणाम झोपेवर देखील होतो. विचार करत राहिल्यामुळे झोप येत नाही. त्यामुळे रात्री झोपताना अर्धा कप दुध आणि त्यात जायफळ पावडर टाकून घ्या, हा अतिशय चांगला उपाय आहे. यामुळे लगेचच झोप येते.

तुम्ही दमत नसाल तर झोप येत नाही

अनेक जण दिवसभर काम करतात. मात्र, तरी देखील ते दमत नाहीत. त्यामुळे अंगातला घाम देखील निघत नाही. त्यामुळे दररोज सकाळी लवकर उठून व्यायाम करा. यामुळे फ्रेश देखील वाटेल आणि काम करण्याचा उत्साह देखील वाढण्यास मदत होईल. त्यामुळे तुम्ही दमाल आणि त्यामुळे तुम्हाला रात्री चांगली झोप लागेल.

झोपण्याआधी चहा, कॉफीचे सेवन

बऱ्याच व्यक्तींना रात्री देखील चहा, कॉफी, चॉकलेट आणि साखर असे पदार्थ खाण्याची सवय असते. या पदार्थांचे झोपण्याआधी सेवन केल्यामुळे त्याचा झोपेवर परिणाम होतो. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी या पदार्थांचे सेवन करणे टाळा.

झोपेची वेळ चुकवू नका

प्रत्येक व्यक्तीची झोपेची एक वेळ असते. त्या व्यक्तीला त्या वेळेतच झोप येते. त्यामुळे ज्यावेळेत तुम्हाला झोप येते ती वेळ चुकवू नका. एखाद्यावेळेस जर झोपेची वेळ चुकवल्यास पुन्हा झोप येत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -