Saturday, June 10, 2023
घर मानिनी Relationship चतुर सासूबाईना कसं हॅण्डल कराल?

चतुर सासूबाईना कसं हॅण्डल कराल?

Subscribe

सासु- सुनेमधील नाते अत्यंत नाजूक असते. या नात्यात केवळ चढ-उतारच नव्हे तर काही अशा स्थिती निर्माण होतात की, दोघांमधील नाते बिघडले जाते. किती ही प्रयत्न केला तर ते पुन्हा आधीसारखे जोडले जात नाही.

घरात सुन म्हणून आलेली मुलगी आपल्या सासू सोबत नाते कसे घट्ट करता येईल याचा प्रयत्न करत असते. पण कधी कधी असे होते की, सासू सोबत सूनेचे पटत नाही. यावरुनच त्या दोघांमध्ये वाद, भांडण सुरु होतात. अशातच दोघांना एकमेकी नकोशा वाटतात. यामध्ये चुक कोणाचीही असो पण नात्यावर परिणाम होतोच. अशातच जर तुम्हाला चतुर सासू मिळाली तर तिला तुम्ही कसे हॅन्डल कराल याच्याच खास टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

- Advertisement -

ज्या महिला नेहमीच नकारात्मक विचार करतात, बोलतात त्यांच्यासोबत राहणे मुश्किल होते. कारण अशी सासू सूनेचे कधीच ऐकून घेत नाही. ती तिच्या कामांमध्ये सुद्धा चुकाच काढते. अशातच सासू नकोशी वाटते. आपण सूनेचा स्वभाव बदलू शकत नाही. तसेच त्यांचा स्वभाव आपण बदलू शकत नाहीत.

- Advertisement -

-चतुर सासू असेल तर सर्वात प्रथम तुम्ही तिच्या बोलण्याकडे लक्ष द्या. ती काय सांगतेय? का सांगत आहे हे काळजीपूर्वक ऐका. कारण तुम्हाला सासू नक्की काय सांगत आहे आणि तिचा त्यामागील नेमका हेतू काय हे कळेल.

-सासू-सुनेमधील गैरसमजामुळे खुप काही गोष्टींवर परिणाम होतो. अशातच तुम्हाला वाटत असेल सासू तुमचे बोलणे चुकीच्या पद्धतीने घेत आहे तर तिच्याशी खुलेपणाने बोला. तुमचे मतं तिच्यासमोर मांडण्यास घाबरु नका.

-काही सासू आपल्या सूनेला यामुळे पसंद करत नाही की, त्यांच्यामुळे घरातील काही नियम बदलले जातील. अशातच सूनेने काही नवी गोष्ट करण्याआधी सासूचा सल्ला घ्यावा.

-जर सासू-सूनेत वाद असतील तर यामध्ये नवऱ्याला मध्ये आणू नये. कारण सासू-सूनेतील वादाचा परिणाम आई-मुलाच्या नात्यावर होऊ शकतो हे लक्षात ठेवा. यामुळे काही गोष्टी अधिकच बिघडल्या जातील.

-भले तुमची सासू तुमच्याशी कितीही मोठ्या आवाजात बोलत असेल पण नेहमीच तिच्या प्रति आपले वागणे नम्र ठेवा. चुकले तर जरुर बोला पण अपशब्दांचा वापर अजिबात यावेळी करु नका. यामुळे तुमचे सासूसह नवऱ्यासोबतचे ही नाते बिघडले जाऊ शकते.

-या व्यतिरिक्त सासू तुमच्या तणावाचे कारण बनू शकते. पण अशातच तिच्याबद्दल इतरांना सांगत बसणे हे चुकीचे आहे. यामुळे तुमच्या सासूचे इतरांच्या समोर व्यक्तिमत्व फार वेगळे दिसेल.


हेही वाचा- ‘या’ समाजात सर्व भावंड एकाच महिलेशी लग्न करतात

- Advertisment -

Manini