Monday, January 20, 2025
HomeमानिनीKitchen Tips- किचन वर्क झटपट होण्यासाठी खास टिप्स

Kitchen Tips- किचन वर्क झटपट होण्यासाठी खास टिप्स

Subscribe

घर आणि ऑफिस सांभाळताना महिलांना रोजच तारेवरची कसरत करावी लागते. पण या हॅक्सच्या मदतीने तुम्ही तुमचे किचनमधील काम सहज आणि कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करू शकता. त्यासाठी काय करायचं ते बघूया.

 मेनू

तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातील काम सोपे करायचे असेल, तर आठवडा भराचे मेनू ठरवा. यामुळे दररोज आज काय बनवायचा हा प्रश्न पडणार नाही.

भाज्या आधीच चिरुन-कापून हवाबंद डब्यात फ्रिजमध्ये ठेवा.

कांदा, आले, लसूण आणि हिरवी मिरची यांसारख्या गोष्टी चिरून फ्रीजमध्ये ठेवा.

आले-लसूण पेस्ट, धणे-टोमॅटो प्युरी यांसारख्या पेस्ट बनवून फ्रीज मद्ये ठेवा.

यामुळे, शिजवताना पुन्हा पुन्हा मसाला किंवा पेस्ट वाटत बसण्याची गरज नाही.

स्मार्ट गॅझेट

बाजारात किचनसाठी उपयुक्त आधुनिक स्मार्ट गॅझेट उपलब्ध आहेत. जसे की फूड प्रोसेसर, ओव्हन,एअर फ्रायर, एग बॉयलर, न्युट्रीब्लेन्ड मिक्सर ग्राएंडर,इंडक्शन कुकटॉप,बारबेक्यू ग्रील, वेजिटेबल चॉपर,कॉफी मेकर, इलेक्ट्रीक केटल इत्यादी या किचन गॅझेटचा उपयोग करून तुम्ही काम लवकर करू शकता.

फूड प्रोसेसरमध्ये कांदा, टोमॅटो, गाजर, भाज्या यासारख्या गोष्टी फूड प्रोसेसरमध्ये पटकन चिरल्या जाऊ शकतात.

डाळी, तांदूळ, बटाटे इत्यादी लवकर शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करा. त्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होते.

मायक्रोवेव्हचा उपयोग भाज्या उकडवण्यासाठी, बटाटे शिजवण्यासाठी आणि पदार्थ लवकर गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह हा चांगला पर्याय असू शकतो.

तसेच स्वयंपाकानंतर लगेचच भांडी किंवा ताट स्वच्छ करा. त्यामुळे नंतर भांड्यांचा ढीग राहणार नाही आणि कामही वेगाने होतील. जर भांडी किंवा चमच्यांची यापुढे गरज नसेल तर ते ताबडतोब धुवा आणि परत ठेवा.

वन-पॉट-कुकींग- ज्यावेळी तुम्ही घाईत असता त्यावेळी खिचडी, पुलाव, बिर्याणी किंवा सूप यांसारखे भाज्या आणि मसाले एकत्र शिजवणारे पदार्थ बनवावे.

मल्टीटास्क- काही गोष्टी शिजत असताना (जसे की डाळ किंवा तांदूळ), तुम्ही भाज्या चिरू शकता किंवा सॅलड तयार करू शकता.

फ्रीझर-कोथिंबीर, पुदिना यांसारख्या हिरव्या भाज्या कापून फ्रिजरमध्ये ठेवा म्हणजे लगेच वापरता येतील. गाजर, वाटाणे, कोबी यांसारख्या भाज्या आगाऊ उकळवून फ्रीजरमध्ये ठेवाव्यात. जेव्हा तुम्हाला त्यांचा वापर करावा लागेल तेव्हा यामुळे वेळ वाचेल. या टिप्स वापरून तुम्ही न थकता आणि न कंटाळा करता किचनचे काम झटपट करू शकता.

 

Manini