Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल Hard work बरोबरच स्मार्ट work करण्यासाठी 'या' टीप्स जरुर वाचा

Hard work बरोबरच स्मार्ट work करण्यासाठी ‘या’ टीप्स जरुर वाचा

Subscribe

एका बाजूला आपण हेल्दी आणि फिट राहण्यासाठी खुप प्रयत्न करतो. तर दुसऱ्या बाजूला जेव्हा मानसिक आरोग्याबद्दल बोलले जाते तेव्हा त्याकडे कानाडोळा करतो. आजूबाजूला वाढत असलेल्या तणावामुळे आपल्या काही काळ थकल्या सारखे वाटत राहते. आपला मेंदू कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करु शकत नाही. हळूहळू याचा प्रभाव वर्क एफिशेंसीवर होऊ लागते. जे आपल्यासाठी चिंतेचे कारण ठरु शकते. पाहता पाहता आपल्यातील प्रोडक्टिव्हिटी कमी होऊ लागते. अशातच तुम्ही हार्ड वर्क तर करता पण त्याचसोबत स्मार्ट वर्क केल्यास काही गोष्टी सोप्प्या होऊ शकतात. त्यासाठी नक्की काय करावे हे पाहूयात.

-कामादरम्यान ब्रेक

- Advertisement -


दिवसभर कामात व्यस्त राहिल्यानंतर आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी थकवा जाणवतो. तसेच पुढील दिवसाच्या कामाची चिंता सुद्धा वाटत राहते. अशा स्थितीपासून दूर राहण्यासाठी तु्म्ही तुमच्या कामाच्या वेळेदरम्यान काही मिनिटांचा का होईना ब्रेक घेतला पाहिजे. जेणेकरुन तुमचे काम तर उत्तम पद्धतीने करण्यास तुम्हाला मदत होईलच पण ते दुसऱ्यांना ही आवडेल.

-मल्टीस्टास्कर बनण्यापासून दूर रहा

- Advertisement -


जर तुम्ही काम मन लावून करत असाल तर ही चांगलीच गोष्ट आहे. याचा रिजल्ट ही उत्तमच येणार आहे. पण जेव्हा तुमच्या हातात एक काम असताना दुसरी कामे करण्याचा प्रयत्न केला तर एक ना धड भाराभर चिंध्या असे कामाचे होऊ शकते. त्यामुळे हातातील पहिले काम पूर्ण करा आणि नंतर दुसरे करण्यास सुरुवात करा. मल्टीस्टास्कर असणे वाईट नाही पण काम करताना ती पूर्ण होतील याची सुद्धा काळजी घ्या.

-पुरेशी झोप घ्या


जर तुम्ही ७-८ तासांची झोप घेतली तर तुम्ही दिवसभर अॅक्टिव्हा राहू शकता. परंतु रात्री उशिरा झोपल्यानंतर सकाळी लवकर उठल्यास त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यासह कामावर ही होतो. तुम्हाला दिवसभर आळस येत राहतो आणि कोणत्याही कामात मन लागत नाही. अशातच पुरेशी झोप घ्या.

-उगाचच कामाचा अधिक भार घेऊ नका


जर तुम्ही दिवसभर एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेतली तर ती तु्म्हाला पूर्ण करता आली पाहिजे. तरच ती करण्याचा विचार करा. अन्यथा उगाचच अधिक भार घेऊ नका. असे केल्याने तुम्हाला थकवा जाणवतोच. पण काम ही व्यवस्थितीत होत नाही.


हेही वाचा- Afternoon nap…दुपारची डुलकी म्हणजे या आजारांना आमंत्रण

- Advertisment -