Friday, September 29, 2023
घर मानिनी Health हृदय healthy राहण्यासाठी हसणं गरजेचं

हृदय healthy राहण्यासाठी हसणं गरजेचं

Subscribe

हसणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते असे म्हटले जाते. तुमचे हसणे, खळखळून हसणे तुम्हाला हेल्दी ठेवू शकते. एकूणच याचा आरोग्याला फायदा होतो. मात्र सर्वाधिक फायदा हृदयाला होतो. हसल्याने आरोग्यासंबंधित आजारांचा धोका फार कमी होतो. याच बद्दल आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत. (Smile best for healthy heart)

एक्सपर्ट्स असे म्हणतात की, हसणे हे हृदयाच्या आणि एकूणच संपूर्ण आरोग्यावर सकारात्मक परिणाम करते. खरंतर जेव्हा आपण हसतो तेव्हा मेंदू एंडोर्फिन सोडतो, जो सर्वसामान्यपणे फील-गुड हार्मोनच्या नावाने ओळखला जातो. यामुळे तणाव कमी होई शकतो आणि आपल्याला आनंदित वाटते. तणाव कमी झाल्याने हाय बीपी, सूज आणि धमन्यांना होणाऱ्या नुकसानीपासून दूर राहता येते. त्याचसोबत डोपाइमन नावाचे हार्मोन वाढले जाते. यामुळे सुद्धा तुम्हाला आनंदी वाटते. अशातच हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.

- Advertisement -

हसल्याने हृदय आपले सुदृढ राहतो. जेव्हा तुम्ही हसता तेव्हा रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता वाढली जाते. हसल्याने तुमचे रक्ताभिसरण उत्तम होते. दररोज हसल्याने शरीरात नाइट्रिक ऑक्साइट उत्तेजित होतात. यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो आणि हे ब्लड सर्कुलेशनला सुरळीत करण्यात मदत करते. यामुळे हार्टसह शरीरातील अन्य टिश्यू पर्यंत ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितीत होते.

- Advertisement -

एक्सपर्ट्स असे म्हणतात की, हसणे आरोग्याच्या हेल्थसाठी उत्तम असते. जी लोक हृदयाच्या आजाराचा सामना करतात अथवा जी लोक सामान्य आहेत त्यांनी सुद्धा हसले पाहिजे. मात्र हृदयाच्या आरोग्यासाठी हा उपाय नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हृदयाचे आरोग्य सारख्यासाठी तुम्ही तुमच्या लाइफस्टाइलमध्ये बदल केला पाहिजे.


हेही वाचा – पार्टनरसोबत एक्सरसाइझ करणे सेक्स लाइफसाठी फायदेशीर

- Advertisment -

Manini