Friday, May 26, 2023
घर मानिनी Health खळखळून हसणं असू शकत Smiling Depression

खळखळून हसणं असू शकत Smiling Depression

आयुष्यात नेहमीच हसतखेळत रहावे असा सल्ला दिला जातो. पण काही व्यक्ती अशा असतात की, आपल्या मनातील दु:ख हे चेहऱ्यावर दिसू नये म्हणून नेहमीच आपला चेहरा हसरा ठेवतात. पण प्रत्येकवेळी हसत असलेली व्यक्ती ही आनंदी असते असे नाही. दु:ख लपवण्यासाठीचे जे हसणे असते त्यामुळे तणावाणाचे आपण शिकार होतो. तणावाच्या याच प्रकाराला Smiling Depression असे म्हटले जाते.

काही वेळा असे होते की, एखाद्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्याबद्दल बोलले जाते. त्याने नक्की असे का केले असेल याचा विचार केला जातो. अशाच प्रकरणांमध्ये स्माइलिंग डिप्रेशनची सुरुवात होऊ शकते. ज्या व्यक्ती बाहेरुन आनंदीत दिसतात त्याच पुढे जाऊन आत्महत्येसारखे पाऊल उचलू शकतात.

- Advertisement -

सर्वसामान्यपणे तणाव म्हणजे रडणे, चिडणे एकटेवाटणे अशा गोष्टी त्यावेळी होतात. परंतु हे सुद्धा समजणे फार गरजेचे असते की, हसरा चेहरा सुद्धा तणावाचा शिकार असू शकतो.

- Advertisement -

स्माइलिंग डिप्रेशनची लक्षणं
अन्य तणावाच्या प्रकारांपैकी स्माइलिंग डिप्रेशन हे फार वेगळे आहे. याला ओखळणे फार मुश्किल असते. याची तीन मुख्य कारणे आहेत. पहिले म्हणजे अंर्तमन उदास असणे, कोणत्याही कामात मन न लागणे आणि लगेच थकवा येणे. म्हणजेच तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात भले खुप काही गोष्टी करता पण त्या कामात मन लागत नाही. त्यानंतर तुम्ही स्वत:ला थकलेले जाणवता आणि कामे मध्येच अर्थवट सोडून देता. जर तुम्हाला नेहमीच डोके दुखी किंवा अंगी दुखी होत राहते तर याकडे वेळीच लक्ष द्या.

अशी स्थिती निर्माण झालेल्या व्यक्तीच्या मेंदूतील Serotonin चे प्रमाण कमी होते. त्यानंतर आफण दुसऱ्या लोकांसोबत आपली तुलना करु लागतो. आपण असे मानतो की, तुमच्या आजूबाजूची माणसे उत्तम आहेत. केवळ तुम्हीच वाईट कामातून जात आहात. यासाठी तुम्ही स्वत:ला दोष देऊ लागता. अशावेळी तुम्ही आपल्या आजूबाजूच्या लोकांशी बातचीत करा. जेणेकरुन तु्म्हाला तुमचे मन हलके झाल्यासारखे वाटेल.

स्विकार करा, तेव्हाच स्थिती बदलेल
काही लोक अशी असतात की, त्यांचे व्यक्तीमत्व फार महत्वाचे अशते. त्यांना असे वाटत असते की, लोकांनी आपल्याला दुबळे समजले पाहिजे. यामुळेच अशी लोक नेहमीच चेहऱ्यावर हास्य ठेवतात. मनोचिकित्सकांच्या मते चेहऱ्यामागील लपलेल्या भावनांचे मुख्य कारण असे की, आम्ही ती स्थिती स्विकारत नाही. आपण त्यावेळी असा विचार करतो, आपली मित्रमंडळी, परिवारातील लोक काय विचार करतील. त्यामुळे मनोचिकित्सिकांना सुद्धा अशी माणसं भेटण्यास नकार देतात. अशातच ते आत्महत्या हे त्यांच्यासाठी योग्य पाऊल असल्याचे त्यांना वाटते.

जी लोक तणावाचा स्विकार करत नाहीत, ज्यांना दुसऱ्यांना सांगायचे नसते अशी लोक गंभीर स्थितीतून जाऊ शकतात. तर अशा व्यक्ती तुमच्या सुद्धा ओळखीत असतील तर त्यांना धीर द्या, त्यांना मोटिवेट करा.


हेही वाचा- रिलेशनशिपमध्ये पार्टनरला Cheat केलंय तर, माफीही मागा

- Advertisment -

Manini