बदाम आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. बदाममध्ये प्रोटिन्स, फायबर, व्हिटॅमिन इ आणि मॅग्नेशियम सारखी पोषकतत्वे आढळतात. कोणत्याही ऋतुत बदाम खाता येतात. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी दररोज बदाम खावेत असे तज्ञ सांगतात. भिजवलेले बदाम सोलून खाल्ले जातात तर कच्चे बदाम सालीसकट खातात. पण बऱ्याचदा अनेकांना हा प्रश्न पडतो बदाम भिजवून खावेत की कच्चे खावेत. चला तर मग जाणून घेऊयात, भिजवलेले की कच्चे बदाम फायदेशीर आहेत.
कच्चे की भिजवलेले बदाम ?
- आरोग्यासाठी कच्चे आणि भिजवलेले बदाम असे दोन्ही प्रकारचे बदाम खाणे फायदेशीर असते. कच्चे आणि भिजवलेल्या बदामाचे आरोग्याला वेगवेगळे फायदे होतात.
- आयुर्वेदानुसार कच्चे बदाम गरम असतात तर भिजवलेले बदाम थंड असतात. त्यामुळे ज्यांना पित्ताची समस्या असेल अशा व्यक्तींनी भिजवलेले बदाम खावेत.
- भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीराला अधिक पोषण मिळते. कच्चे बदाम उष्ण असल्याने त्यांचे लवकर पाचन होत नाही. कच्च्या बदामच्या तुलनेने भिजवलेले बदाम लवकर पचतात.
- बदामाच्या सालीमध्ये टॅनिन असते, हे टॅनिन पोषक तत्वांचे शोषण रोखते. त्यामुळे बदाम साल काढून खाणे अधिक फायदेशीर असते.
- भिजवलेल्या आणि कच्च्या बदामांमध्ये समान कॅलरीज आढळतात. फरक इतकाच असतो की, भिजवलेल्या बदामांच्या कॅलरीज शरीर लवकर शोषून घेतात.
- उन्हाळ्यात कच्चे बदाम खाऊ नयेत. असे बदाम खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात भिजवलेले बदाम खावेत.
- ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम खावेत. हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या व्यक्तीने बदाम खाल्लास नैसर्गिकरित्या ब्लड प्रेशर नियंत्रणात राहू शकते.
- भिजवलेले बदाम ऍटी-ऑक्सिडंट समृद्ध असतात. यामुळे शरीरात जळजळ कमी होते.
- तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात बदामाचा समावेश करू शकता. पण, एका दिवसात 20 ते 22 पेक्षा जास्त बदाम खाऊ नयेत.
हेही पाहा –