काही लोकांना इतरांमध्ये मिक्स व्हायला किंवा बोलायला भिती वाटते. अशा व्यक्ती गर्दीत जायलाही घाबरतात. त्यांना घरातच कम्फर्टेबल वाटते. अशा व्यक्ती सोशल एन्जाइटी किंवा सोशल फोबियाच्या आजाराने ग्रस्त असण्याची शक्यता असते. पण, या सोशल एन्जाइटीकडे तितक्या गंभीरतेने पाहिले जात नाही. ज्याचा परिणाम एखाद्या गंभीर आजारात होऊ शकतो. खरं तर, सोशल एन्जायटी हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. वेळीच या आजाराची लक्षणे ओळखल्यास यातून बाहेर पडणे सहज शक्य आहे.
लक्षणे –
- स्वत:ला इतरांपेक्षा कमी समजणे
- नवीन लोकांना भेटण्यास संकोच वाटणे
- फोन न उचलणे
- सार्वजनिक शौचालयाचा वापर न करणे
- एखाद्याची मदत घेताना 10 वेळा विचार करणे
- भावना व्यक्त करताना घाबरणे
- मत मांडता न येणे
- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे
सोशल एन्जाइटी दूर करण्यासाठी उपाय –
- श्वासावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. तुम्हाला लोकांशी बोलायला भिती वाटत असेल तर तुम्ही श्वासाचा व्यायाम करायला हवा. 2 ते 3 मिनिटे हा व्यायाम केल्याने आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.
- सोशल एन्जाइटी दूर करण्यासाठी फिजिकल ऍक्टीव्हिटी करणे गरजेचे आहे. फिजिकल ऍक्टीव्हिटीमध्ये तुम्ही धावणे, वेट लिफ्टिंग असे प्रकार करू शकता.
- जर तुम्हाला गर्दीच्या ठिकाणी जायला भिती वाटत असेल तर मानसिकरीत्या सक्षम व्हायला हवे. मानसिक तयारी करण्यासाठी तुम्ही आरश्यात स्वत:शी बोलू शकता.
- सोशल एन्जाइटी दूर करण्यासाठी तुम्ही थेरेपिस्टशी मदत घेऊ शकता. थेरेपिस्ट नक्कीच यातून बाहेर पडण्यासाठी उपाय सुचवतील.
- दररोज व्यायाम, योगासनांचा सराव करावा. यामुळे सोशल एन्जाइटी दूर करण्यास मदत मिळेल.
- आहारातून कॅफिन, साखरयुक्त पदार्थ कमी करावेत.
- पोषणयुक्त आहार घ्यावा. यात तुम्ही हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश करू शकता.
- दररोज 7 ते 8 तासांची झोप घ्यावी.
- झोपण्याआधी मोबाइल, टिव्ही यापासून दूर राहावे.
- Advertisement -
- Advertisement -
हेही पाहा –